Amla Benefits : तुम्ही रोज एक आवळा खाल्ल्याने काय होईल?

या रूग्णांनी आवळा खाऊ नये
Amla Benefits
Amla Benefitsesakal

Amla Benefits : आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते. हे घटक केसांसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर सिद्ध होतात. रोज रिकाम्या पोटी आवळा खाणे किंवा त्याचा रस प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

हिंदू धर्मात आवळ्याला महत्त्वपूर्ण स्थान आहे. देवपूजेतही आवळा वापरतात. आपल्याकडे तुलसी विवाहाला आवळा, चिंच यांचा रूखवतच तुलसीमातेला देतात. आयुर्वेदातही आरोग्याशी देखील संबंधित आहे. आवळ्याचे रोज सेवन केले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होईल का तोटा? (Amla Benefits : advantages and disadvantages of eating amla in marathi What happen if we eat raw amla daily?)

तुम्ही जर आवळ्याचे सेवन केले तर तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. ते कोणते आणि आवळा किती प्रमाणात खावा याबद्दल जाणून घेऊयात. (Amla)

Amla Benefits
Amla for Skin Care: तरुण दिसण्यासाठी कॉस्मेटिक्स नाही तर फक्त 1 आवळा करेल मदत!

आवळा खाण्याचे फायदे

आवळ्याच्या सेवनाने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. पावसाळ्यात अनेकदा लोक संसर्गाला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर गूसबेरीचे नियमित सेवन केले तर व्यक्ती या संसर्गांपासून स्वतःचा बचाव करू शकते.

त्वचा उजळते

जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आवळा समाविष्ट करू शकता. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर केसांना चमकदार बनवते. (Skin Care)

मधुमेहावर गुणकारी

मधुमेहाचे रुग्ण आपल्या आहारात आवळा समाविष्ट करू शकतात. आवळ्याच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.

Amla Benefits
Amla Chutney Recipe : बदलत्या वातावरणात शरीरासाठी आरोग्यदायी ठरेल ही चटपटीत आवळा चटणी

केस निरोगी होतात

ज्यांना केसांशी संबंधित समस्या आहेत ते आपल्या आहारात आवळा समाविष्ट करू शकतात. आवळाच्या वापराने केस मजबूत तर होतातच पण केसगळती रोखण्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकते. (Hair Care Tips)

डोळे निरोगी होतात

रोज एक आवळा खाल्ल्याने डोळ्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. आवळ्याच्या वापराने डोळे निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता येतात.

शुक्राणूंची संख्या वाढते

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत करते. यासोबतच आवळ्याच्या सेवनाने काम शक्ती देखील वाढते. यासोबतच आवळा फिजिकल पावार सुधारण्यासाठी देखील ओळखला जातो.

Amla Benefits
रोज फक्त एक आवळा खा, हे 5 आजार कायम पळतील दूर

या रूग्णांनी आवळा खाऊ नये

आवळ्याचा रस हा लिव्हर संबंधित आजार असणाऱ्या रूग्णांसाठी अत्यंत हानिकारक ठरतो. यात असणारी विटामिन सी आणि अधिक आम्लिय तत्व हे लिव्हरचे आजार अधिक त्रासदायक करू शकतील.

ज्या व्यक्तींना किडनीशी संबंधित आजार आहेत, त्यांच्या आवळा खाणं अथवा आवळ्याचा ज्युस पिणं हे हानिकारक ठरू शकते.

उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी आवळा फायदेशीर ठरते, मात्र ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांना आवळ्यामुळे नुकसान पोहचते. यामध्ये रक्तदाब कमी करण्याची अधिक क्षमता आहे.  (Health Tips)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com