esakal | चक्क मुंग्यांनी लंपास केली सोन्याची चेन; Video Viral
sakal

बोलून बातमी शोधा

चक्क मुंग्यांनी लंपास केली सोन्याची चेन; Video Viral

काही मुंग्यांनी खाद्यपदार्थांऐवजी चक्क सोन्याची चेनच लंपास केली आहे.

चक्क मुंग्यांनी लंपास केली सोन्याची चेन; Video Viral

sakal_logo
By
शर्वरी जोशी

लहानशी वाटणारी मुंगी साधारणपणे साखरेचा रव्याचा दाणा घेऊन जातांना साऱ्यांनीच पाहिलं असेल. पण जर हीच मुंगी खाद्यपदार्थ सोडून थेट सोन्याच्या वस्तू लंपास करु लागली हे ऐकलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का?  अर्थात नाहीच. परंतु, प्रत्यक्षात असं घडलं आहे. काही मुंग्यांनी खाद्यपदार्थांऐवजी चक्क सोन्याची चेनच लंपास केली आहे. या मुंग्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे अनेकांनी या मुंग्यांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही मुंग्या त्यांच्या पाठीवरुन चक्क सोन्याची चेन घेऊन जात असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत दीपांशू काबरा यांनी या मुंग्यांना सगळ्यात लहान गोल्ड स्मगलर असं म्हटलं आहे.

दरम्यान, या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास ४ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर, कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे. यामध्येच हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीत पडत आहे.

हेही वाचा : महिला डॉक्टरचा 'कार'नामा; कोरोनाच्या भीतीमुळे कुटुंबापासून राहते दूर

यात, "कोणत्या कलमांअंतर्गत यांच्यावर कारवाई होणार?", असा मजेशीर प्रश्नही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
 

loading image
go to top