
अनुराधा काशिद
भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या नांदघूर येथे महाराष्ट्रातील पहिला बांबूच्या शेतीचा आणि बांबू पर्यटन प्रकल्प उदयास आला आहे. उच्चशिक्षित महिला शेतकरी अनुराधा काशिद यांनी पती राहूल काशिद यांच्या मदतीने बांबूचे उत्पादन, लागवड, व्यवस्थापन आणि एकात्मिक प्रक्रिया उद्योग करण्यासाठी दहा एकर क्षेत्रात ‘द बांबू सेतू’ नावाचा नवीन प्रकल्प सुरू केला आहे. ‘द बांबू सेतू’ हे स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी देत आहे.