Parent Teacher Meet
Parent Teacher MeetSakal

पालकसभा

शाळेतील पालकसभा तक्रारसभा होत आहेत का? शिक्षक-पालकांमधील तणावामुळे मुलांवर विपरीत परिणाम होतो. संवादातून समस्यांचे निराकरण करण्याची गरज आहे.
Published on

राजीव तांबे - साहित्यिक, बालमानसविषयक तज्ज्ञ

मी अनेक शाळांतल्या पालकसभांना हजर राहिलो आहे. या पालकसभा तर मला ‘तक्रारसभा’च वाटतात. केविलवाणे पालक वर्गात बसलेले असतात. शिक्षक हातात मशिनगन घेऊन वर्गात येतात आणि तक्रारींचा बेछूट गोळीबार करू लागतात. अनेक पालक घायाळ होतात, जखमी होतात, तर काही पालकांना तिथल्यातिथेच पुनर्जन्माचा अनुभव येतो आणि पालकसभा संपते. मग हे जखमी विव्हळणारे पालक घरी जाऊन मुलांवर वार करत आपल्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com