esakal | लाइफस्टाईल कोच : बहुगुणी कवठ

बोलून बातमी शोधा

Kavat

भारतात उपयोगी पडणारा डाळी, कडधान्यं, भाज्या, फळं या सर्वांचा पोषण खजिना भारतातच उपलब्ध आहे. त्यांचे फायदे माहीत नसल्यानं आणि ‘फास्ट फूडचं’ अतिमार्केटिंग झाल्यानं भारतीय पदार्थांमधला त्यांचा वापर कमी झाला आहे. नवीन पिढीला त्यांचे फायदे माहीत होणं गरजेचं आहे. या मालिकेत आपण उच्च पोषणयुक्त भारतीय अन्नघटकांची माहिती करून घेत आहोत.

लाइफस्टाईल कोच : बहुगुणी कवठ
sakal_logo
By
डॉ. मनीषा बंदिष्टी

भारतात उपयोगी पडणारा डाळी, कडधान्यं, भाज्या, फळं या सर्वांचा पोषण खजिना भारतातच उपलब्ध आहे. त्यांचे फायदे माहीत नसल्यानं आणि ‘फास्ट फूडचं’ अतिमार्केटिंग झाल्यानं भारतीय पदार्थांमधला त्यांचा वापर कमी झाला आहे. नवीन पिढीला त्यांचे फायदे माहीत होणं गरजेचं आहे. या मालिकेत आपण उच्च पोषणयुक्त भारतीय अन्नघटकांची माहिती करून घेत आहोत. अनेकांना हे सगळे जिन्नस माहीत असतील; पण त्यांचे आरोग्यविषयक फायदे माहीत नसतील. गेल्या आठवड्यात आपण अळूच्या पानांची माहिती घेतली. आज कवठाची माहिती करून घेऊ.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कवठ
कवठ साधारण छोट्या नारळासारखं दिसतं. त्याला इंग्लिशमध्ये ‘वूड ॲपल्स’ म्हणतात. ते पिकलेलं आहे की नाही, हे बघण्यासाठी त्याची ‘बाउन्स टेस्ट’ उपयोगी पडते. ते कठीण पृष्ठभागावर पाडा. ते बाउन्स झालं, तर त्याचा अर्थ ते पिकलेलं नाही. पिकलेलं असेल, तर ते जमिनीवर एक विशिष्ट आवाज करून पडेल आणि बाउन्स होणार नाही. पूर्णपणे पिकलेल्या कवठाचा गर फिकट करड्या किंवा ‘टॉफी ब्राऊन’ रंगाचा असेल. 

महत्वाचे घटक

  • कवठ हा बिटा-कॅरोटिनचा अतिशय उत्तम स्रोत आहे. हे बिटा-कॅरोटिन शरीरात व्हिटॅमिन ‘ए’मध्ये रूपांतरित होतं. कांती नितळ होणं आणि दृष्टी क्षीण न होणं, यासाठी ते उपयोगी पडतं. 
  • कवठात व्हिटॅमिन ‘सी’ चांगल्या प्रमाणात असल्यानं ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडू शकतं. संसर्गांशी लढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 
  • या फळातून रायबोफ्लॅविन, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरस ही खनिजंही मिळतात. 
  • कवठ हे शीतकारी, पाचक फळ आहे. पचन वाढवणं, यकृत आणि मूत्रपिंडं ‘क्लिन्झ’ करण्यासाठी ते उपयोगी पडतं. 
  • या फळात अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म असून, ते खाल्ल्यामुळे घशाला बरं वाटतं. 

कवठाचे लाभ

  • कवठ पचनसंस्थेचं रक्षण करतं. पोटामध्ये अल्सर होतो तेव्हा ते उपयोगी पडतं. 
  • अपचन आणि बद्धकोष्ठता यांच्यावर गुणकारी ठरतं. 
  • प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि स्नायूंना झालेली दुखापत कमी करण्यासाठी उपयोग होतो. 
  • चयापचयाला बळ मिळतं. 
  • त्वचा आणि केसांसाठी चांगलं. 

पिकलेल्या कवठाची चटणी
कवठ फोडा आणि त्यातल्या गरातले मोठे तंतू काढून टाका. हा गर हलके स्मॅश करा आणि त्यात तीन टेबलस्पून गूळ, चिमूटभर हळद, तिखट, मीठ, हिंग आणि जिरे घाला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. झाली तुमची चटणी तयार!

Edited By - Prashant Patil