esakal | फॅशन टशन : उन्हाळा करा कूल कूल...

बोलून बातमी शोधा

denim skirt

फॅशन करण्यासाठी उन्हाळा नक्कीच चांगला सीझन आहे. उकाड्याचा सामना करताना तितकीच चांगली फॅशन करणे कठीण होते. स्कर्ट हा फॅशनमधील एक एव्हरग्रीन प्रकार आहे. कोणतीही मुलगी किंवा महिला स्कर्टची फॅशन करून ट्रेंडी दिसू शकते. काही बेसिक पद्धतीच्या स्कर्टसोबत फॅशन करण्याच्या टिप्स तुम्हाला देणार आहोत.

फॅशन टशन : उन्हाळा करा कूल कूल...
sakal_logo
By
ऋतुजा कदम

फॅशन करण्यासाठी उन्हाळा नक्कीच चांगला सीझन आहे. उकाड्याचा सामना करताना तितकीच चांगली फॅशन करणे कठीण होते. स्कर्ट हा फॅशनमधील एक एव्हरग्रीन प्रकार आहे. कोणतीही मुलगी किंवा महिला स्कर्टची फॅशन करून ट्रेंडी दिसू शकते. काही बेसिक पद्धतीच्या स्कर्टसोबत फॅशन करण्याच्या टिप्स तुम्हाला देणार आहोत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) डेनिम स्कर्ट
डेनिम अर्थात जीन्सचा स्कर्ट. डेनिम स्कर्टची फॅशन बऱ्याच काळापासून पाहायला मिळतेय. डेनिम स्कर्टमध्ये आता अनेक नवीन प्रकार बाजारात आले आहेत. त्यामध्ये शॉर्टपासून गुडघ्यापर्यंत असे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात. मध्यभागी कट असलेले, बटण असलेले, हायवेस्ट, टोर्न, ए लाइन असे अनेक प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. यावर सॉलिड रंगांचे प्लेन टॉप किंवा पांढऱ्या रंगाचे शर्ट टक इन करूनही शोभून दिसते. आउटिंग, पिकनिक, पार्टी अनेक ठिकाणी हा स्कर्ट घालू शकता. ऑफिसमध्येही पांढऱ्या रंगाच्या फॉर्मल शर्टसोबत हा स्कर्ट चांगला पर्याय ठरु शकेल.

2) प्लिटेड स्कर्ट
प्लिटेड स्कर्ट प्रत्येक बॉडी टाइपसाठी उत्तम प्रकार आहे. वापरण्यासाठी आणि स्टाइल करण्यासाठी अगदी सोपा पर्याय आहे. या स्कर्टला थोडासा घेर असल्याने आणि नेहमीच्या स्कर्टपेक्षा याची लांबी जास्त असल्याने टॉप फिटिंगचा घालावा. टॅंक टॉप, कॅमी, फुल स्लिव्ह, हाय नेक टॉप हे इन करून या स्कर्टसोबत घालता येतील. प्लिटेड स्कर्टसोबत एखादा प्लेन टी-शर्ट, स्टेटमेंट नेकलेस, हिल्स ट्राय करा, ज्यामुळे तुम्हाला फॅंसी लुक मिळेल.

3) मिनी स्कर्ट
स्कर्टमधील मिनी स्कर्ट हा कायमच फेव्हरेट आहे. आपण २०००च्या दशकातील चित्रपटांवर नजर टाकल्यास राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, प्रिती झिंटा आणि करिना कपूर यांनी कॅरी केलेली मिनी स्कर्टची फॅशन ही कमाल आहे. हीच स्टाईल आताही ट्रेंडमध्ये आहे. मिनी स्कर्ट घालण्यासाठी अनेक जण लाजतात, पण त्यासोबतही विविध प्रकारे फॅशन करता येऊ शकते. मिनी स्कर्ट हे बॉडी फिटींगचे असल्याने त्यावर लुज टॉप घालावा. उन्हाळा असल्याने सॉलिड फरचे क्रॉप, टॅंक टॉप किंवा टी-शर्ट घालून त्यासोबत पांढरे स्निकर्स घालावेत. हा फंकी आणि ट्रेंडी लुक होईल. हा स्कर्ट रात्री घालणार असल्यास हिल्स घाला. हा स्कर्ट घातल्यावर तुम्हाला अवघडल्यासारखे  वाटत असल्यास तुम्ही स्टॉकिंग्स घालू शकता.

4) स्लिट स्कर्ट
स्लिट म्हणजे स्कर्टला कोणत्याही एका बाजूने असणारा कट. त्यामुळे या स्कर्टमधून एक पाय उघडा दिसतो. अतिशय वेगळ्या पद्धतीचा आणि ट्रेंडी असा हा स्कर्ट आहे. स्लिट स्कर्टमध्ये फ्लोरल, प्रिंटेड, लाइनिंग, फ्लेअर, प्लेन ब्लॅक असे विविध प्रकार पाहायला मिळतात. तुम्ही जास्त लांबीच्या स्लिटमध्ये कर्म्फरटेबल नसल्यास अगदी लहान स्लिटचे स्कर्टही तुम्हाला सहज मिळतील. यावर लांब हातांचे आणि प्लेन टॉप घातल्यास उठून दिसतात. कारण, स्कर्टच्या स्लिटमुळे लुक हा फॅशनेबल दिसतोच. 

5) बॉडीकॉन स्कर्ट
बॉडीकॉन म्हणजेच तुमच्या बॉडीला पूर्ण फिटिंग देणारा स्कर्ट. हा स्कर्ट काही प्रमाणात हाय वेस्ट, म्हणजेच पोटापासून गुडघ्यापर्यंत फिटिंग देतो. यामध्ये तुमची बॉडी एखाद्या माशाप्रमाणे दिसते. यावर शॉर्ट टॉप, स्लिवलेस, हाय नेक, फुल स्लिव्ह असे टॉप उठून दिसतील. स्कर्ट हा हायवेस्ट असल्याने शॉर्ट घालावेत. पार्टी, आउटिंग, शॉपिंगसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय ऑफिसमध्येही पांढऱ्या रंगाच्या फॉर्मल शर्टसोबत हा स्कर्ट कॉर्पोरेट लुक देतो. या स्कर्टने तुमची उंचीही नेहमीपेक्षा जास्त दिसते.