

Ashadhi Ekadashi 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share
sakal
DEVOTIONAL MARATHI WISHES FOR ASHADHI EKADASHI 2026: आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अखंड श्रद्धेचा, भक्तीचा आणि विठ्ठलनामाच्या गजराचा पवित्र उत्सव. या दिवशी लाखो वारकरी "ज्ञानोबा-तुकाराम"चा जयघोष करत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत सुख, समृद्धी आणि मंगलमय जीवनासाठी प्रार्थना केली जाते. अशा या भक्तिमय दिवशी आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि नातेवाईकांना प्रेम, श्रद्धा आणि आशीर्वादाने भरलेल्या शुभेच्छा पाठवून आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित करा. "अवघा रंग एक झाला..." म्हणत विठ्ठलभक्तीचा हा पवित्र संदेश प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवा.