Vastu Tips : आठवड्यातील 'या' दिवसांत घेऊ नका कर्ज, फेडणे होईल कठीण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Money Tips

Vastu Tips : आठवड्यातील 'या' दिवसांत घेऊ नका कर्ज, फेडणे होईल कठीण

एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात. कधीकधी अशी परिस्थिती येते की, पैसे उधार घेण्याची इच्छा नसते मात्र गरजच इतकी असते की पैसे उधार घ्यावे लागतात. यावेळी तुम्ही तुमचे नातेवाईक, मित्र किंवा बँकेकडून पैसे कर्जाच्या स्वरुपात घेता. परंतु जेव्हा तुम्ही घेतलेले पैसे परत करू शकत नाही तेव्हा समस्या अधिकच बिकट होते.

बऱ्याचवेळा पैशांची जुळवाजुळव करुनही तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नाही. कधी कधी परिस्थिती अशी येते की तुम्हाला कर्जापेक्षा व्याजच अधिक द्यावे लागते. ज्योतिष शास्त्रानुसार, हे सर्व घडते कारण तुम्ही आर्थिक व्यवहार करताना दिवस आणि नियम लक्षात न ठेवता व्यवहार करता. दरम्यान, ज्योतिष शास्त्रात आठवड्यातील कोणत्या दिवशी तुम्ही पैशाशी संबंधित व्यवहार करू नयेत. किंवा कोणत्या दिवसांत कर्ज घेणे तुमच्यासाठी जड जाऊ शकते यासंदर्भात माहिती दिली आहे. ती खालीलप्रमाणे..

हेही वाचा: Travel Blog : चवदार पदार्थांवर ताव मारायला 'या' ठिकाणी गेलंच पाहिजे!

कर्जाचे व्यवहार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

  • सूर्यदेव ऋणी मानला जातो, त्यामुळे रविवारी कर्ज घेऊ नये.

  • ज्योतिष शास्त्रात परिवर्तनशील आरोह शुभ मानला जात नाही. या दिवसांत कोणालाही पैसे देणे टाळावे.

  • कर्ज घेताना मूल, आद्रा, ज्येष्ठा, विशाखा, कृतिका, ध्रुव स्ग्नक नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्र लक्षात ठेवा.

  • संक्रांतीच्या दिवशी कर्ज घेऊ नये. या दिवशी घेतलेले कर्ज फेडणे कठीण होते.

  • वृद्धी योग, द्विपुष्कर योग, त्रिपुष्कर योग यामध्येही कर्ज घेऊ नये. या योगांमध्ये घेतलेले कर्ज वाढते.

आठवड्यातील 'या' तीन दिवसांत कर्ज घेणे ठरेल अडचणीचे

ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, आर्थिक व्यवहार करताना आठवड्यातील वेळेला विशेष महत्त्व असते. कर्ज घेण्यापूर्वीचे दिवस लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी कर्ज घेऊ नये. या दिवशी कर्ज घेतल्याने माणूस अधिक कर्जात अडकतो. शनिवारी तसेच मंगळवार आणि रविवारी कर्ज घेऊ नये. जर तुम्ही आठवड्याच्या या 3 दिवसांत कर्ज घेत असाल तर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात. परंतु या दिवसांत कर्ज फेडणे चांगले मानले जाते. कर्जाचा हप्ता भरण्यासाठी मंगळवार हा सर्वात शुभ दिवस आहे.

हेही वाचा: Astro Tips : महत्वाच्या 'या' ५ गोष्टी नियमित केल्यास तुमचं नशीब फळफळेल

Web Title: Astro Money Tips These Three Days Do Not Take Money Or Loan From Other

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..