Astro Tips: फक्त ओम नमः शिवाय म्हटल्याने दूर होतील जीवनातली संकट; घडतील मोठे बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Astro Tips

Astro Tips: फक्त ओम नमः शिवाय म्हटल्याने दूर होतील जीवनातली संकट; घडतील मोठे बदल

कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरीही आर्थिक संकट दूर होत नाहीये? महादेवाचा हा जप करेल सगळ्या संकटातून मुक्ती. अनेक वेळा माणसाला मेहनत करूनही यश मिळत नाही. लाख प्रयत्नांनंतरही त्याच्या हाती निराशाच येते; तसे यावरती ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत.

याचे कारणंही प्रत्येकवेळी वेगळे असते, जसे कधीकधी व्यक्तीचे ग्रह अनुकूल नसतात किंवा कधीकधी आजूबाजूच्या परिस्थितीमुळे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महादेवाचा चमत्कारिक मंत्र ज्योतिषशास्त्रात सांगितला आहे. या मंत्राचा योग्य प्रकारे जप केल्याने तुमचे नशिब चमकते.

ज्योतिषशास्त्रानुसार, ओम नमः शिवाय हा महादेवाच्या सर्वोत्तम मंत्रांपैकी एक आहे. या मंत्राचा जप केल्याने तुम्ही संकटातून बाहेर पडतातच आणि तुम्हाला त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेपूर शक्ती देखील मिळते.

ओम नमः शिवाय मंत्राचा जप करण्याचे फायदे

  • जीवनात सकारात्मक बदल घडतात

    या मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने आपल्या शरीरातील पाण्याला ऊर्जा मिळते. या मंत्राच्या जपासाठी स्फटिक किंवा रुद्राक्षाची जपमाळ घ्यावी. हा मंत्र आपल्या जीवनात ढालीसारखे काम करतो. ग्रहाची स्थिती कोणतीही असो, तो प्रत्येक परिस्थितीत तुमचे रक्षण करतो. कार्यसिद्धी साठी व्यक्तीने या मंत्राचा ४१ दिवस जप करावा.

  • कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल

    शास्त्रानुसार नमः शिवाय हा पानाक्षरी मंत्र आहे. पण जेव्हा ओम सोबत लावला जातो तेव्हा तो खूप शक्तिशाली मंत्र बनतो. नमः शिवाय हे पंच महाभूताचे प्रतिनिधित्व करते असे म्हटले जाते. प्रत्येक ग्रहावर शिव शंकराचे राज्य असते आणि या मंत्राचा जप केल्याने आपण कोणत्याही ग्रहाच्या अशुभ प्रभावातून बाहेर पडू शकतो. जेव्हा ९ ग्रह १२ नक्षत्रांमधून जातात तेव्हा ते १०८ संयोग तयार करतात. अशा स्थितीत या मंत्राचा १०८ वेळा जप केल्याने कोणत्याही ग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होऊ शकतात.

टॅग्स :lord shiv