
Astrology : 'या' चार राशीचे लोक कधीच कुणाचे चांगले मित्र होऊ शकत नाही
प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीला एक वेगळं स्थान आहे.आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेकदा वेगवेगळ्या लोकांसोबत मैत्री होते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक चांगली मैत्री असते पण मैत्री करणे जितके सोपे आहेत तितकीच ती मैत्री निभावणे कठीण आहे.
ज्योतिषशासास्त्रानुसार काही राशीचे लोक कधीच चांगले मित्र होऊ शकत नाही किंवा मैत्री निभाऊ शकत नाही. त्या राशी कोणत्या? चला तर जाणून घेऊया.
मेष राशी
मेष राशीचे लोक खूप कठोर आणि हट्टी असतात. ते त्यांच्या आवेगपुर्ण वागणूकीसाठी ओळखले जातात. ते अनेकदा स्वत:चं मत पटवून देण्यासाठी वाद घालतात आणि जवळच्या मित्रांशीही भांडतात. अनेकदा त्यांचं स्वार्थी वागणूकीमुळे ते त्यांच्या मित्रांपासून दुरावतात. त्यांचं वर्चस्ववादी व्यक्तिमत्त्व सहज मैत्री आणि कोणत्याही नात्यामध्ये तेढ निर्माण करते.
कर्क राशी
कर्क राशीचे लोक खूप मुडी असतात. त्यांच्या आवेगपुर्ण आणि ओवर सेन्सेटीव वागणूकीमुळे ते अनेकदा जवळच्या लोकांना दुखावतात. कधी कधी हे सर्वांसमोर आपल्याच मित्रांचे पाय खेचतात यामुळे मैत्री वाद, गैरसमज आणि भांडण होण्याची दाट शक्यता असते. या राशीला गरजेपेक्षा जास्त विचार करण्याची सवय असते ज्यामुळे अनेकदा अनावश्यक वाद ते स्वत: ओढवून घेतात.
हेही वाचा: Astrology: V अक्षरापासून नाव असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
वृषभ राशी
वृषभ राशीचे लोक हे खूप स्ट्रॉंग डोक्याचे असतात. त्यांना नवीन मित्र बनवायला आवडतात आणि ते खूप मजाही करतात पण जेव्हा त्यांना गरज असते तेव्हाच. बाकी वेळी ते मित्रांपासून दूर राहतात. अनेकदा त्यांचा मित्रांशी फारसा संवाद होत नाही त्यामुळे अनेक गैरसमजही निर्माण होतात. त्यांना नेहमी स्पेस आणि प्रायवेसी हवी असते. त्यामुळे ते मित्रांना कोणत्याच अडी-अडचणीत मदत करू शकत नाही.
सिंह राशी
सिंह राशीचे लोक नेहमी स्वत:चा आधी विचार करतात आणि नंतर इतरांचा विचार करतात. त्यामुळे ते अनेकदा स्वार्थी ठरतात. त्यांच्या या स्वार्थी स्वभावामुळे ते अनेकदा चांगले मित्र गमवतात. ते काळजी घेतात किंवा मदत करतात पण अनेकदा या मागे स्वार्थीपणा दडलेला असतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.