कुठल्याही वाहनात बसल्यावर मुलांना सर्वांत आधी खिडकीतच बसायचे असते, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. याची अनेक कारणे आहेत; पण बहुधा मुख्य कारण म्हणजे, वाहन सुरू झाले की सोबतच्या मोठ्या माणसांच्या सूचनाही त्याच वेगात सुरू होतात..सूचनांकडे आणि पर्यायाने मोठ्या माणसांकडे (काळजीपूर्वक) दुर्लक्ष करण्यासाठी मुले खिडकीतून बाहेर पाहात असावीत. म्हणूनच मुलांचे खिडकीतून बाहेर पाहणे ‘सकारात्मक’ होण्यासाठी मोठ्या माणसांनी त्यांना मदत करणे अपेक्षित असते.मुलाचे खिडकीतून पाहणे सकारात्मक करणे म्हणजे, मुलाची निरीक्षणशक्ती, त्याची वाचनगती, त्याचे कुतूहल, त्याची जिज्ञासा, त्याची स्मरणशक्ती, आकलनशक्ती वाढविणे आणि विकसित करणे यासाठी प्रयत्न करणे. यासाठी प्रवासात मुलासोबत खेळायचे पाच खेळ सुचवितो. हे खेळ खेळता खेळता मुलेच तुम्हाला आणखी सात खेळ सुचवतील. मग तुम्हालाही त्यात नवीन नऊ खेळ गवसतील..ऑटो रिक्षा सुरू झाल्यानंतर पुढील पाच मिनिटात किंवा सिग्नलला थांबेपर्यंत रस्त्यावरील दुकानांच्या पाट्या मुलगा आणि पालक या दोघांनी भराभर वाचायच्या. कोण जास्ती वाचतो ते पाहायचं आणि रिक्षा थांबल्यावर वाचलेल्या पाट्या किती लक्षात आहेत आणि क्रमवार लक्षात आहेत का? ते पाहायचं.आपण ज्या दिशेने जात आहोत त्याच दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या नंबरप्लेट मुलगा व पालकांनी काळजीपूर्वक पाहायच्या. मुलगा सम आणि पालक विषम. दोघांनी मिळून सम की विषम नंबरची वाहने जास्त दिसली? ते शोधायचं. यावरून कोण जिंकलं ते कळेल. पुढच्यावेळी मुलगा विषम आणि पालक सम असे करावे..प्रवास करताना आपल्याला वाहनांवर, दुकानांवर, जाहिरातीत, बॅंकांवर वेगवेगळे लोगो दिसत असतात. जो प्रथम लोगो बघतो आणि ओळखतो त्याला एक मार्क. मुलांना बहुधा सर्व गाड्यांचे लोगो माहित असल्याने त्यांना जास्त मार्क मिळण्याची संभावना असते. प्रवासात उजव्या आणि डाव्या बाजूला वेगवेगळे रस्ते, बोळ, चौक, तिठे असतात. या सगळ्यांना आधिकृत नावे असली, तरी आपण त्यांना काहीवेळा वेगळ्याच नावाने ओळखत असतो..आता मात्र प्रथम डावीकडच्या नंतर उजवी कडच्या मार्गांची, बोळांची, चौकांची आणि तिठ्यांची अधिकृत नावं ओळखायची आणि लक्षात ठेवायची आहेत आणि अर्थातच प्रवास संपल्यावर हीच नावे क्रमवार सांगता आली पाहिजेत. तोच जिंकला. या खेळात अधिकृत नावे न आठवल्यास, प्रवास संपल्यानंतर गुगल मॅपची मदत घेऊन चालेल..रस्त्यावर वाहनचालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या मदतीसाठी काही खुणा केलेल्या असतात. उदा. एक दिशा मार्ग, समदिवशी पार्कींग, प्रवेश निषिद्ध वगैरे. आपल्या प्रवासात अशा किती खुणा दिसल्या त्या प्रत्येकाने मोजायच्या आहेत आणि ‘तीच खूण तिथेच का केली असेल?’ याबाबत एकमेकांना प्रश्न विचारायचे आहेत. तर मग करा सुरुवात आणि कळवा मला तुमची खेळाखेळी.‘प्रेमळ आणि प्रगल्भ पालकच मुलांशी खेळू शकतात’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल म्हणा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.