तुम्हाला डँड्रफची समस्या आहे का? तर मग लिंबूसोबत या खास गोष्टीचा करा वापर

to avoid and stop dandruff problem use this tricks for lifestyle in kolhapur
to avoid and stop dandruff problem use this tricks for lifestyle in kolhapur

कोल्हापूर : डँड्रफची समस्या तशी प्रत्येकासाठी सामान्य अशीच आहे. जर तुम्ही यावर वेळीच उपाय केले नाहीत तर मात्र ही समस्या कायमची मागे लागेल. फक्त केसच खराब होतात असं नाही तर डँड्रफमुळे तुम्हाला इतर अडचणींचा सामना करावा लागतो. शरीरावर पिंपल्स होणं, त्वचेला खाज सुटणे, कान वाहणे यासारखे त्रासही होऊ शकतात.

त्वचेशिवाय तुमच्या नखांमध्ये हा डँड्रफ गेला तर त्यात फंगल इन्फेक्शनही होऊ शकतं. म्हणजे फक्त केसांसाठीच नाही तर त्वचा, नखे यांसह आरोग्यासाठीही डँड्रफ हानीकारक ठरतो. यासाठी वेळीच त्यावर उपाय करणं गरजेचं आहे. यासाठी काही सोप्या टीप्स तुम्हाला फायद्याच्या ठरतील.

डँड्रफची कारणे

तुमच्या डोक्यात डँड्रफ होण्याची अनेक कारणं असू शकतात. प्रत्येकवेळी एकाच कारणाने डँड्रफ होईल असं नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या कारणानं डँड्रफ होऊ शकतो. 

  • केसांचे पोषण नीट न झाल्यानं
  • त्वचेतील पीएच लेव्हल कमी झाल्याने
  • शरीरातील पाण्याचं प्रमाण घटल्यास
  • केमिकल असलेली सौंदर्यप्रसाधने जास्त वापरल्यानं
  • स्कॅल्प (केसांची मुळे) स्वच्छ न ठेवल्यानं

डँड्रफवर उपाय काय?

डँड्रफ घालवण्यासाठी लिंबू आणि नारळाचे तेल फायद्याचे ठरते. तुम्हाला यासाठी नारळाचे तेल 2 ते 3 चमचे आणि एक लिंबू लागेल. 2 ते 3 चमचे तेल घेऊन त्यामध्ये लिंबू रस मिसळा. दोन्ही चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर कापसाच्या गोळ्यानं हे मिश्रण केसाला लावा. लिंबू आणि नारळाच्या तेलाचं मिश्रण केसांना लावल्यानंतर किमान एक तास तसंच ठेवा. यानंतर माइल्ड शाम्पूने केस धुवा. शाम्पू वापरताना त्यामध्ये रीठा, आवळा, कोरफड असल्यास त्याचा फायदा होईल.

असा होतो फायदा

लिंबू आणि नारळ तेल मिसळून केसांना लावल्यास हे मिश्रण शाम्पूमुळे होणारं नुकसान कमी करतं. लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिड असतं. यामुळे त्वचेची खपली निघण्यासाठी मदत होते. यामुळे त्याच्यात असलेले अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरिअल डोक्याच्या त्वचेला इन्फेक्शन फ्री करते.

नारळाच्या तेलाचा फायदा

नारळाचे तेल केसांना लावल्यानं स्कॅल्प कोरडे होत नाहीत. यामुळे डँड्रफचं प्रमाण कमी होतं. तसंच तेल तुमच्या डोक्याच्या त्वचेची आर्द्रता योग्य प्रमाणात ठेवते. यामुळे केसांचा कोरडेपणा वाढत नाही आणि पूर्ण पोषण मिळते.

डँड्रफ कायमचा जाईल

आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लिंबू आणि नारळाचे तेल लावल्यास डँड्रफ कायमस्वरुपी जाऊ शकतो. तुम्हाला ही समस्या कशामुळे आहे यावरही डँड्रफ पुन्हा न होणं अवलंबून आहे. खाणं-पिणं काय आहे, त्यातून पोषक द्रव्ये मिळतात का? हेसुद्धा महत्त्वाचे ठरते. केस धुण्यासाठी जास्त गरम पाणी वापरू नका. यामुळे केस खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com