Social Media Addiction : सोशल मीडियाशिवाय बनवा आयुष्य सुंदर अन् संतुलित

छंद जोपासणे गरजेचे आहे. यातून तुमचे आयुष्य सुंदर आणि संतुलित होऊ शकते.
Social Media Addiction
Social Media Addictionesakal

Social Media Addiction : सोशल मीडिया जगाला आपल्या अवती भवती भिंगरी सारखे पिंगा घालायला लावत आहे. पाच वर्षांच्या मुलगा, एवढेच नव्हे तर भाजी विक्रेत्यापासून तर जगातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण दिवसातील जास्तीत जास्त तास सोशल मीडियावर घालवत आहेत. किशोरवयीन मुलांसह सर्वच वयोगटातील लोकांना सोशल मीडियाचे गंभीर व्यसन जडत आहे. या गंभीर व्यसनावर केवळ ‘छंद’च लगाम लावू शकते. त्यामुळे छंद जोपासणे गरजेचे आहे. यातून तुमचे आयुष्य सुंदर आणि संतुलित होऊ शकते.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

का येते नैराश्य?

सोशल मीडियाच्या दोन बाजू आहेत. स्वत:च्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी ते एक उत्तम साधन आहे तर सवय म्हणून आपण रील्समधून स्क्रोल करण्यात वेळही घालवतो. सोशल मीडियावरील आपले आयुष्य हे केवळ आपले आणि आपल्या मित्रांचे आणि कुटुंबाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे आणि लोकांशी संपर्क ठेवण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. तर ही एक स्पर्धा झालेली आहे. या स्पर्धेत आपल्यापैकी बहुतेकजण अपयशी ठरतात आणि त्यामुळे गंभीर नैराश्य आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

Social Media Addiction
Social Media : जगातील ६५ टक्के लोक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह; दररोज सरासरी अडीच तास करतात सर्फिंग

सोशल मीडियापासून मुक्तीसाठी हे करा

सोशल मीडियाशिवाय एक दिवस घालवणे अशक्य झाले असेल जर तुम्ही स्वत:ला त्यातून बाहेर काढणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी तुमच्या इन्स्टाग्रामवरील तुमच्या फॉलोअर्सची यादीची काढून टाका.

जीवनातील महत्त्वाच्या आणि उपयुक्त गोष्टींबद्दल तुम्हाला शिक्षित करू शकतील अशा लोकांचे आणि खात्यांचे अनुसरण करा. अशा प्रकारे तुम्हाला स्क्रोलिंगमधून सुटका मिळू शकते.

Social Media Addiction
Social Media : 'मित्रांवर'ही विश्वास ठेवणं झालंय कठीण; सोशल मीडियाचा वापर करताना घ्या अशी काळजी

दिवसातील किमान दोन तास सोशल मीडियापासून स्वतःला मुक्त करा. या काळात तुम्ही छंद जोपासण्यात आणि स्वत:ची विकासात्मक कामे करण्यावर भर द्या.

पुढच्या काही आठवड्यात सोशल मीडियावर तुम्ही घालविलेल्या तासांची संख्या हळूहळू कमी करण्यासाठी स्वतः निश्‍चय करा.

सोशल मीडियावर घालवित असलेला वेळ कमी करण्यासाठी कमीत कमी पाच विविध छंद शोधा, त्यामुळे तुम्हाला जेव्हाही सोशल मीडियावर स्क्रोल करण्याची इच्छा होईल तो वेळ तुम्ही छंदामध्ये घालवू शकता. तुमचे सोशल मीडियाचे व्यसन वैयक्तिक जीवनात अडथळा आणत असल्यास तज्ज्ञ समुपदेशकाची मदत घ्या.

- मालविका शर्मा, मानसरोग तज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com