
कमी दर्जाच्या किंवा वापरलेल्या भेटवस्तू देणे टाळा, कारण यामुळे मित्राचा अपमान होऊ शकतो.
अंतर्वस्त्र किंवा अति वैयक्तिक भेटवस्तू देणे मैत्रीत गैरसमज निर्माण करू शकते.
रोख रक्कम किंवा कर्जाची ऑफर देणे टाळा, कारण यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो.
Gifts To Avoid: यंदा मैत्री दिन ३ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. हा दिवस तुमच्या मित्रांसोबत प्रेम आणि आनंद शेअर करण्याचा एक खास प्रसंग आहे. मैत्रीचं नातं अमूल्य असतं आणि ते मजबूत करण्यासाठी आपण अनेकदा आपल्या मित्रांना भेटवस्तू देतो. पण, तुम्हाला माहिती आहे का की काही भेटवस्तू तुमच्या मैत्रीच्या नात्यात दरी निर्माण करू शकतात? चला जाणून घेऊया त्या ५ गोष्टींबद्दल, ज्या तुम्ही तुमच्या मित्राला कधीही देऊ नयेत.