esakal |  गजराजाचं अनोखं धुलिवंदन; तुम्हालाही आवडेल व्हिडीओ
sakal

बोलून बातमी शोधा

 गजराजाचं अनोखं धुलिवंदन; तुम्हालाही आवडेल व्हिडीओ

हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ होतोय लोकप्रिय

 गजराजाचं अनोखं धुलिवंदन; तुम्हालाही आवडेल व्हिडीओ

sakal_logo
By
शर्वरी जोशी

आज धुलिवंदन असल्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण विविध रंगात न्हाऊन निघाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावरदेखील होळी, रंगपंचमी असे अनेक हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडीओ लोकप्रिय होत आहे. विशेष म्हणजे या गजराजालाही धुलिवंदनाचा मोह आवरला नाही अन् त्याने थेट पाण्यात जाऊन आपली रंगपंचमी साजरी केली. विशेष म्हणजे या गजराजाने कोणत्याही रंगांशिवाय केवळ नैसर्गिकरित्या रंगपंचमी साजरी केल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हत्तीचं एक पिल्लू पाण्याच्या कुंडाजवळ जाऊन तेथील पाण्यात डुंबण्याचा मनसोक्त आनंद घेतांना दिसत आहे. कधी तो या पाण्याचे फवारे उडवत आहे. तर, कधी त्या पाण्यात लोळत आहे. त्यामुळे त्याच्या या बाललिला पाहून अनेकजण त्याच्या प्रेमात पडले आहेत.

हेही वाचा : चक्क मुंग्यांनी लंपास केली सोन्याची चेन; Video Viral

हा व्हिडीओ शेअर करत मन गयी अपनी होली असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. त्यामुळे सध्या धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, आतापर्यंत या व्हिडीओला १८ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर, कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी नैसर्गिकरित्या रंगपंचमी अशीच खेळली पाहिजे असं म्हटलं आहे.
 

loading image
go to top