

Back Pain Relief : शरीरात कॅल्शिअमची कमतरता झाली की आपल्याला अनेक आजारांची लागण होते. त्यामध्ये पाठदुखीची समस्याही आहे. आजकाल पस्तीशी ओलांडली की सगळे म्हातारेच झाल्यासारखे वाटतात. जड सामान उचलायचं म्हटली की पाठ,कंभर धरते. काही लोकांना तर सतत उभं राहूनही पाठदुखी सुरू होते.
पाठीच्या दुखण्यामुळे आजच्या काळात अर्ध्याहून अधिक लोक त्रस्त आहेत. पाठदुखीची अनेक कारणे असू शकतात, शरीरात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता याशिवाय अनेकदा चुकीच्या पोजमध्ये बसल्यामुळे पाठदुखीची समस्या उद्भवते.
पाठदुखी होण्यामागे काही वेळा गंभीर कारणेही असतात. मणक्याला फ्रॅक्चर झाल्यास, स्लिप डिस्क, संधिवात, सांधेदुखी, मणक्यांमध्ये गाठ आल्यास, मूतखडे यामुळेही पाठदुखी होऊ शकते. ओटीपोटात सूज आल्याने स्त्रियांना पाठदुखी होते. अशा गंभीर कारणांवेळी थेट डॉक्टरकडे जायला हवे. (Back Pain Relief)
बहुतेकदा ही समस्या वयाच्या 30 नंतर सुरू होते. पाठदुखीमुळे लोकांना उठणे आणि बसणे कठीण होते. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्या फॉलो केल्याने तुम्ही पाठदुखीची त्रास होणार नाही.
पाठदुखीची कारणे
अपघात- कारला झालेला अपघात, घसरून पडल्यामुळे मणक्याला इजा होते, पाठ सुजते.
सांधेदुखी – सांध्याना संरक्षण देणारे कार्टलेिजचे आवरण वयोमानानुसार झिजते. त्यामुळे उतारवयात मणका दुखायला लागतो.
हाडे ठिसूळ होणे – बहुतांश स्त्रियांना उतारवयात हाडे ठिसूळ होण्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. हात, पाय यासोबत पाठदुखीही यामुळे होते.
मानसिक – शरीरासोबतच मनावरील ताण-तणाव अनेक आजारांना निमंत्रण देतात. निराशा, अस्वस्थता, असमाधान यामुळेही पाठदुखी होऊ शकते.
यासोबतच वाढलेले वजन, वृद्धापकाळ, महिला, अवजड वस्तू उचलण्याचे काम, तणावपूर्ण काम, निराशा हे सुद्धा तुमच्या पाठीच्या दुखण्यासाठी कारणीभूत आहे. (Back Pain)
पाठदुखी कशी टाळायची?
खुर्चीवर एकाच स्थितीत जास्त वेळ बसू नये, पाठीला आणि हातांना खुर्चीचा पूर्ण आधार मिळत आहे हे लक्षात ठेवा. प्रत्येक एक तासानंतर खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे स्नायू चांगले काम करू शकतील.
लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर काम करताना लक्षात ठेवा की संगणकाचा माउस 90 अंशाच्या कोनात असावा. त्याचबरोबर मोबाईल वापरतानाही मान झुकवू नका, फक्त डोळे खाली करा.
कोणत्याही प्रकारचे वजन उचलताना लक्षात ठेवा की तुम्ही ते आरामात उचलता, अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यानंतर अनेक दिवस पाठदुखीची तक्रार असते.
झोपताना आपल्या एका अंगावर झोपणे चांगले आहे, याशिवाय, आपण पायांमध्ये उशी ठेवून देखील झोपू शकता. झोपताना डोक्याखाली उंच उशी ठेवणेही टाळावे, उशी घेऊन झोपण्याची सवय असेल तर बारीक उशीचा वापर करा.
टीव्ही किंवा चित्रपट पाहताना तुमच्या बसण्याच्या स्थितीची काळजी घ्या. अनेक वेळा पलंगावर तासनतास चुकीच्या पद्धतीने बसल्याने पाठदुखी सुरू होते. (Health Tips)
पाठदुखी यामुळे थांबू शकते
पाठ दुखीचा त्रास होत असल्यास रोज झोपताना नारळाच्या अथवा मोहरीच्या तेलाने मालिश करा. यामध्ये चार-पाच लसूण पाकळ्या टाकून ते तेल गरम करून थंड झाल्यानंतर पाठीला मालिश केल्याने वेदना कमी होतात. हे तेल लावल्यानंतर अर्ध्या तासांनी अंघोळ करावी.
योगासन हा पाठ दुखीवरील उत्तम उपाय आहे. त्रिकोणासन, भुजंगासन, मार्जरासन ही योगासने रोज करा. यामुळे दंडाचे स्नायू, पायांचे स्नायू, ओटीपोटीचे स्नायू यांची कार्यक्षमता वाढते. पाठीचा कणा लवचिक बनतो आणि पाठदुखी नाहीशी होते.
पाठ दुखत असल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मीठ टाकुन आंघोळ करा. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायु मोकळे होण्यास मदत मिळते. पाठ दुखीपासून आराम मिळतो.
पाठदुखीसह अन्य दुखणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात सकस आहाराचा समावशे करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यातून आपली हाडे मजबूत होत असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.