- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आपण सगळे वेगवेगळ्या नात्यांमध्ये आपल्या भूमिका पार पाडत असतो. आई-वडिलांच्या जबाबदारीच्या भूमिकेत, मुलीच्या मृदू आणि समजूदार भूमिकेत, मुलाच्या जबाबदारीच्या भूमिकेत, सहकाऱ्याच्या चर्चेत, किंवा एखाद्या जुन्या मित्र-मैत्रिणीच्या भूमिकेत. कोणतंही नातं म्हटलं, की ते एक द्वंद्वगीत असल्यासारखं असतं. आपण कोणत्याही नात्यात ‘एकटे’ नसतो. आणि प्रत्येक नातं आपल्याकडून काहीतरी मागत असतं.