अंघोळ करताना या चूका टाळा, सुंदरता होईल कमी | Bathing Tips in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bathing Tips in Marathi

Bathing Tips: अंघोळ करताना या चूका टाळा, सुंदरता होईल कमी

Skin Care Tips: रोज सकाळी उठून अंघोळ (Bath)करणे प्रत्येकाच्या दिनचर्येचा भाग आहे. सकाळी उठून अंघोळ केल्यास तुम्हाला फ्रेश वाटते आणि तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होते. पण तुम्हाला माहितीये का योग्य पद्धतीने कशी करावी माहिती आहे का? होय, आपल्यापैकी बरेच लोक अंघोळ करताना काही सामान्य चूका करतात ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. (Bathing Tips in Marathi)

अंघोळ करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अंघोळ करताना तुम्ही काळजी घेतली तर तुमची त्वचा सुंदर आणि उजळ होऊ शकते आणि तुम्ही कित्येक आजारांपासून वाचू शकता.

हेही वाचा: तुमचं नातं सुरूवातीच्या काळातच का तुटते? तुम्ही 'या' चूका करत नाही ना!

खूप वेळ अंघोळ करू नका

काही लोकांना आपली त्वचा सुंदर आणि उजळ बनविण्यासाठी खूप वेळ करायला आवडते. पण, अंघोळ करण्याची ही पद्धत अत्यंत नुकासदायक असू शकते. खूप वेळ अंघोळ केल्याने तुमची त्वचा कोरडी पडू शकते आणि त्वचेला खाज सुटू शकते व इन्फेक्श होऊ शकते.

खूप गरम पाण्यानी अंघोळ करू नका

हिवाळ्यामध्ये थंडीपासून वाचण्यासाठी बहूतेक लोक गरम पाण्याने अंघोळ करतात. अशावेळी पाणी जास्त गरम नाही ना याची खात्री करा कारण त्यामुळे तुम्हाला भाजण्याची शक्यत असते. तसेच खूप गरम पाण्याने अंघोळ केल्यास सुरकुत्या पडू शकता आणि तुमची त्वचा रुक्ष होऊ शकते.

हेही वाचा: तुमचा जोडीदाराचा डॉमेनिटिंग स्वभाव कसा ओळखाल? जाणून घ्या

हर्बल प्रॉडक्ट करा वापर

आजकाल बहूतेक लोक अंघोळ करताना महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरतात करतात. पण यामध्ये एक उपलब्ध केमीकल्स तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असतात. हे प्रोडक्ट तुमच्या त्वचेतील पेशी नष्ट करता आणि वयाच्या आधी तुम्ही वयस्कर दिसू लागता. त्यामुळे अंघोळ करताना हर्बल शॅम्पू आणि साबणचा वापर करा.

स्पंज वापरू नका

कित्येकदा तुम्ही अंघोळ करताना त्वच्या साफ करण्याासाठी ब्रश किंवा स्पंजचा खूप जास्त वापर करता पण ही अंघोळीची चूकीची पद्धत आहे. त्वचेला जास्त घासल्यास तुमच्या त्वचेतीली छिद्र मोठी होतात आणि त्यामध्ये किटाणू सहज प्रवेश करू शकतात आणि तुम्हाला कित्येक आजार होऊ शकतात.

त्वचेला टॉवलेने घासू नका

अंघोळ केल्यावर पाणी सुकविण्यासाठी काही लोक शरीरावर जोरात घासतात पण त्यामुळे तुमच्या त्वचेतील मॉइस्‍चराइजर संपून जाते आणि त्वचा रुक्ष होऊन जाते. त्यामुळे टॉवेलने हळुवार पाणी त्वचेवरून फिरवा त्यामुळे त्वचेतील मॉइस्‍चराइजर कमी होणार नाही.

Web Title: Bathing Tips Avoid These Mistakes While Bathing It Will Reduce The Beauty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyleFace BeautyBath
go to top