- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ‘ड्रेस वेल अँड फील बेटर’ - म्हणजे चांगले कपडे घातलेत, तर तुम्हाला चांगलं वाटेल. आता ही केवळ म्हण नसून, हे एक मानसशास्त्रीय सत्य आहे. आपल्या मनाची स्थिती आणि आपण घातलेले कपडे यांचा घनिष्ठ संबंध असतो. एखादी व्यक्ती काय कपडे घालते, याचा तिच्या वागणुकीवर म्हणजेच वर्तनावर, भावनेवर आणि सर्वांत महत्त्वाचं आत्मविश्वासावर थेट परिणाम होतो.