esakal | केस मऊ, चमकदार होण्यासाठी भारतासह परदेशात वापरली जाते 'ही' पध्दत
sakal

बोलून बातमी शोधा

केस मऊ, चमकदार होण्यासाठी भारतासह परदेशात वापरली जाते 'ही' पध्दत

केस मऊ, चमकदार होण्यासाठी भारतासह परदेशात वापरली जाते 'ही' पध्दत

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत, जी केसांशी संबंधित प्रत्येक समस्येला दूर करून त्यांना अधिक निरोगी बनवतात. लोक यावर खूप पैसा खर्च करतात. कधीकधी अगदी साधे उपाय केसांसाठी इतर उत्पादनांपेक्षा अधिक फायदेशीर ठरतात. केस वॉश नेमके कसे करावे याविषयी खुप माहिती आपल्यासमोर येते. कोणता शॅम्पू, कंडीशनर वापरावा. याविषयी अनेकदा आपण कनफ्यूज असतो. पण अगदी पूर्वापार एक अशी पध्दत आहे जी स्त्रिया आपल्या देशात अनेक पिढ्यांपासून अवलंबत आहेत. आजही परदेशात ती वापरली जाते. ती म्हणजे मातीने केस धुणे. परदेशातही केस धुण्याची ही पद्धत बरीच लोकप्रिय झाली आहे. नेमका याचा काय फायदा आहे. जाणून घेऊया..

3 हेअर मास्क वापरा

आपल्या देशात आजही स्त्रिया गावातील शुद्ध मातीने आपले केस धुतात. पण शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना अशी चिकणमाती मिळणे कठीण आहे. केस धुण्यासाठी प्रामुख्याने तीन प्रकारचे क्ले लोकप्रिय आहेत: Rhassoul/Ghassoul, Bentonite आणि Kaolin. हे तीन हेअर मास्क म्हणून देखील वापरले जातात.

स्काल्प आणि केस स्वच्छ करणे

केमिकल बेस्ड प्रॉडक्ट ने स्काल्पचे नुकसान होते. मात्र माती ने केस धुतल्याने कोणतेही नुकसान होत नाही. चिकणमाती घाण आणि विषारी पदार्थांना आकर्षित करते आणि जेव्हा ती पाण्याने धुतली जाते तेव्हा केस आणि स्काल्प पूर्णपणे स्वच्छ होतात.

केस मऊ आणि चमकदार होतात

क्लेमध्ये विविध प्रकारची खनिजे आणि पोषक घटक असतात, जे निरोगी केस राखण्यास मदत करतात. जेव्हा केस निरोगी असतील तेव्हा केस गळणे कमी होईल आणि त्यांची चमक हळूहळू वाढेल.

केसांची नैसर्गिक पीएच पातळी वाढवा

केसांची नैसर्गिक पीएच पातळी सुमारे 4.5 असते. शॅम्पू त्याचे नुकसान करू शकतात. त्याच वेळी, मातीने केस धुवून हे पीएच बॅलन्स राखले जाऊ शकतात. pH केस आणि टाळूचे जीवाणू आणि बुरशीपासून संरक्षण करते. ते नैसर्गिक ओलावा दूर करून केसांना मुळांपासून मजबूत बनवतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या देखील दूर होते. केसांची पीएच लेवल मेंटेन राहते.

याची काळजी घ्या

प्रत्येक उत्पादनाप्रमाणे, मातीशी संबंधित काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बाजारातून घेतलेल्या चिकणमातीची पॅच टेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की त्यातील घटकांमुळे तुम्हाला अॅलर्जी होऊन रिएक्शन तर होणार नाही ना. तसेच, जर तुमचे केस दोन वेळा धुतल्यानंतर खराब झाले असतील तर ते वापरणे थांबवा. यासाठी क्ले वॉश ब्रँडचा सल्ला तज्ञाकडून घ्या.

loading image
go to top