esakal | फेशिअल शीट मास्कने काही मिनिटांतच मिळवू शकता इन्स्टंट ग्लो! नक्की वाचा

बोलून बातमी शोधा

face mask

फेशिअल शीट मास्कने काही मिनिटांतच मिळवू शकता इन्स्टंट ग्लो! नक्की वाचा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

महिलांना चेहऱ्याच्या त्वचेसंबंधी एनेक समस्या असतात. या समस्येतून तुमची सुटका करण्यासाठी आम्ही एक घरगुती आणि साधा उपाय सांगणार आहोत. तुम्हाला फेशिअल शीट मास्क माहिती आहे का? याच फेशिअल शीट मास्कचा वापर करून तुम्ही केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये इन्स्टंट ग्लो मिळवू शकता. जाणून घेऊया शीट मास्क आणि सीरम तयार करण्याची पद्धत

​फेशिअल शीट मास्क सीरम तयार करण्याची सामग्री

एक चमचा कोरफड जेल

एक चमचा गुलाब पाणी

अर्धा चमचा ग्लिसरीन

दोन थेंब एसेंशिअल ऑईल

एक फेशिअल मास्क

सीरमसाठी घरगुती सामग्रींचा वापर करावा. कारण यामुळे त्वचेला नैसर्गिक घटकांचा पुरवठा होईल. शिवाय कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. दीर्घ काळासाठी लाभ मिळतील. केमिकलयुक्त घटकांचा वापर करणं टाळा.

​असं तयार करा फेशिअल शीट मास्क

- एका वाटीत मास्क टॅबलेट घेऊन त्यावर थोडंसं पाणी ओतून हलक्या हातानं उघडा.

- मास्क पूर्णपणे उघडल्यानंतर ते स्वच्छ भांड्यामध्ये पसरवून ठेवा.

- आता एक मोठी प्लेट घ्या आणि त्यामध्ये एक-एक करून सर्व सामग्रींचा समावेश करा.

- सर्वप्रथम गुलाब पाणी घ्या त्यामध्ये ग्लिसरीन मिक्स करा.

- आता यामध्ये कोरफड जेल आणि एसेंशियल ऑईलचा सुद्धा समावेश करा.

- याच प्लेटमध्ये आपण शीट मास्‍क घेऊन ती चांगल्या पद्धतीनं पसरवून ठेवणार आहोत.

- काही मिनिटांसाठी शीट मास्‍क प्‍लेटवर ठेवून द्या. जेणेकरून सर्व सामग्री ते मास्क शोषून घेईल.