Beauty Tips : बेसनात दडलंय सौंदर्याचं 'राज', तरुणींसाठी नव्हे तरुणांच्याही फायद्याचं

beauty tips
beauty tips

beauty tips सुंदर असणे आणि सुंदर दिसणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सौंदर्याची व्याख्या करणं खूपच अवघड टास्क आहे. अनेकदा आपल्याकडे रंगावरुन सुंदरता ठरवली जाते. पण मुळात रंग हा सौंदर्याचा निकषच ठरु शकत नाही. तसे असते तर बॉलिवूडमध्ये नावजलेली आणि मराठी अस्मिता म्हणून ओळख निर्माण करणारी स्मिता पाटील हिट ठरली नसती.

पण चेहरा उजळ दिसावा (याचा अर्थ गोरी दिसणं एवढा न घेता तेलकट किंवा डागांनी मळकट चेहरा न दिसणे असा घ्यावा) यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सौदर्य प्रसाधने तरुणी सर्वाधिक वापरत असली तरी आजकालची पोरही नटापटा करायला कमी नाहीत.  घरगुती आणि चेहऱ्याची उत्तम निगा राखण्याठी घरात रोज वापरात येणारे आणि स्वस्तात मस्त फेश वॉशचा सर्वोत्त देणारा पर्याय म्हणजे बेसनाचे पिठ. जाणून घेऊयात या बेसनात दडलेल्या सौदर्याच्या गुपतीबद्दल...    

1)बेसन च्या पिठामध्ये दही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रंग उजळतो व चेहऱ्यावरचे डागही जातात

2)बेसनामध्ये मध लिंबाचा रस मिसळून याचा लेप चेहऱ्यावर लावल्याने मुरूम कमी होतात व रंगही उजळतो

3)बेसनात हळद पावडर व लिंबाचा रस मिसळून लावल्याने उन्हापासून त्वचेचे रक्षण होते त्वचा काळी पडत नाही 

4)बेसन मध्ये कच्चे दूध मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील तेलकट पण कमी होण्यास मदत होते.

5)बेसन मध्ये हळद पावडर व मध मिसळून लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. नारळाचे दूध मिसळून लावल्याने सुध्दा चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com