Dark Lips Remedy काळे पडलेले ओठ होतील नैसर्गिकरित्या गुलाबी, वापरा ‘हे’ आयुर्वेदिक तेल

Castor Oil Benefits For Lips: ओठ कोरडे पडत असतील किंवा ओठ काळे पडतील असतील तर आपल्या ब्युटी केअर रूटीनमध्ये आयुर्वेदिक तेलाचा समावेश करावा.
Castor Oil Benefits For Lips
Castor Oil Benefits For Lipssakal

Castor Oil Benefits For Lips: आयुर्वेदिक उपचारांमध्ये एरंडेल तेलास खूप महत्त्व आहे. आपणही या तेलाबाबत बरीच माहिती ऐकली असेल व वाचलीही असावी. त्वचा आणि केसांचं आरोग्य निरोगी राहावे, यासाठी बहुतांश जण ब्युटी केअर रूटीनमध्ये एरंडेल तेलाचा समावेश करतात. 

तर काही जण या तेलाचे सेवनही करतात, कारण यामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या औषधी गुणधर्मांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे.  एरंडेल तेलामध्ये ओमेगा 6 , ओमेगा 9 यासारखे फॅटी अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन ई यासारख्या पोषणतत्त्वांचाही समावेश आहे. 

याव्यतिरिक्त एरंडेल तेलामध्ये अँटी- इंफ्लेमेटरी, अँटी- बॅक्टेरिअल आणि अँटी- फंगल हे गुणधर्म देखील आहेत; ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आपण चेहऱ्यावर नियमित स्वरूपात एरंडेल तेल लावल्यास अ‍ॅलर्जी, त्वचेवरील डाग व मुरुमांची इत्यादी समस्या कमी होण्यास मदत मिळते. 

Castor Oil Benefits For Lips
Celebrity Hair Care Tips : अभिनेत्री भाग्यश्री केसांसाठी या 2 तेलांचा करते वापर, जाणून घ्या तेलाचं नाव-फायदे

ओठांवरही एरंडेल तेल लावल्यास ओठांची त्वचा मऊ होते शिवाय ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी रंग प्राप्त होतो. ओठांवर एरंडेल तेल लावल्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, याबाबतची माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 

Castor Oil Benefits For Lips
White Hair Remedies : केस काळे करण्यासाठी नारळाच्या तेलात मिक्स करा 'या' बिया, पांढऱ्या केसांची समस्या होईल दूर

ओठांवर एरंडेल तेल लावण्याचे फायदे (Castor Oil Benefits For Lips In Marathi)

  • ओठांच्या आसपास असणारी पिगमेंटेशनची समस्या कमी होण्यास मदत मिळते   

  • त्वचेवरील मृत पेशींची समस्या कमी होते 

  • ओठ हायड्रेटेड राहतात 

Castor Oil Benefits For Lips
सावधान! घाणेरड्या बेडशीटमुळे होऊ शकतात त्वचेच्या गंभीर समस्या, इतक्या दिवसांनी बदलावं अंथरूण
  • ओठांना नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळते 

  • काळ्या पडलेल्या ओठांची समस्या दूर होण्यास मदत मिळू शकते 

  • नियमित व योग्य पद्धतीने वापर केल्यास ओठ गुलाबी-मऊ होऊ शकतात 

ओठांवर एरंडेल तेल कसे लावावे? (How To Apply Castor Oil On Lips In Marathi)

  • ओठांची त्वचा निरोगी राहावी, यासाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकता 

  • तेलाचे एक ते दोन थेंब घ्या आणि लिप बामप्रमाणे तेल ओठांवर लावावे

  • काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करावा 

  • रात्री झोपण्यापूर्वी नियमित ओठांवर एरंडेल तेल लावल्यास नक्कीच फायदे मिळतील

  • याव्यतिरिक्त आपण घरच्या घरीही एरंडतेल तेलाचा लिप बाम तयार करू शकता

कसे तयार करावे लिप बाम?

  • एक कढईमध्ये शिया बटर गरम करून वितळवून घ्या.  

  • बटर वितळल्यानंतर गॅस बंद करा.

  • वितळलेल्या बटरमध्ये एक चमचा एरंडेल तेल, तुमच्या आवडीनुसार अन्य कोणतेही तेल व मध मिक्स करा. 

  • तयार झाले आहे लिप बाम. 

  • या लिप बामचा नियमित वापर केल्यास ओठांचा रंग नैसर्गिकरित्या गुलाबी होण्यास मदत मिळू शकते. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com