Beauty Tips : ओठांच्या काळेपणाचे मुख्य कारण लिपस्टिक असू शकते का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beauty Tips

Beauty Tips : ओठांच्या काळेपणाचे मुख्य कारण लिपस्टिक असू शकते का?

लिपस्टिक ही सर्वांत जास्त वापरल्या जाणारी सौंदर्यप्रसाधनाची वस्तू आहे. कुठल्याही लूकवर सुंदर दिसण्याकरता सर्रास लिपस्टिकचा वापर केला जातो. कुठलाही कार्यक्रम असो , सण असो , अगदी घराच्या बाहेर जाणं का असेना , लिपस्टिकचा वापर हा होणारच‍. पण हेच लिपस्टिक ओठांच्या काळेपणाचे कारण बनत आहे का ? याविषयीची माहीती सौंदर्यविशेषकांकडून घेऊया....

हेही वाचा: Beauty tips : चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी असा करा टॉमेटोचा वापर

एका इंटरव्हूमधे त्वचारोगविशेषक डाॅक्टर रीचा सिंग यांनी सांगितले , लिपस्टिकमध्ये काही प्रमाणात रासायनिक पदार्थ मिसळलेले असतात . त्यामुळे अप्रत्यक्षपणे ओठांची त्वचा काळवंडण्यामागे लिपस्टिक हे एक कारण असू शकतं. कमी किमतीच्या किंवा स्वस्तात मिळणार्या लिपस्टिक वापरणं शक्यतो टाळावं कारण त्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक आणि हानिकारक पदार्थांचा वापर केला गेलेला असतो. त्यामुळे ओठांची त्वचा काळवंडण्याची शक्यता असते.

हेही वाचा: Beauty Tips : चामखिळीमुळे चेहरा विद्रुप दिसतोय ; करा हा घरगुती उपाय

तुमची त्वचा जर संवेदनशील असेल तर तूमच्या ओठांच्या त्वचेवर रासायनिक पदार्थांची प्रक्रिया होऊ शकते. त्याचप्रमाणे ऊन्हामुळे , धुम्रपानामुळे किंवा त्वचेला कमी पडणार्या पाण्याच्या प्रमाणामुळे ओठ काळे पडू शकतात. त्यामुळे काही महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन नियमीतपणे ओठांची काळजी घेतली तर ती त्वचा पून्हा पूर्ववत होण्यास मदत होते.

हेही वाचा: Beauty Tips : ही अभिनेत्री चाळीशीतही दिसते ग्लॅमरस; काय आहे रहस्य?

ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी महत्वाच्या बाबी

१. ओठांकरता सनस्क्रीनचा वापर करणे - हानिकारक सूर्यकिरणांचा प्रभाव ओठांवर होऊ नये यासाठी सनस्क्रीनचा वापर करने महत्वाचे आहे.

२. लिपस्टिकमध्ये वापरल्या जाणार्या पदार्थांबाबत सावधानता बाळगावी - लिपस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक पदार्थ वापरण्यात येत असल्याने , लिपस्टिक निवडताना ती आपल्या त्वचेसाठी योग्य आहे की नाही हे तपासून घ्यावे.

३. जून्या लिपस्टिकचा वापर करणे टाळावे - फार काळ वापरलेली किंवा जूनी असलेली लिपस्टिक वापरने टाळावे त्यामूळे ओठांना नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते.