
कोल्हापूर :आपल्याला माहित आहे का या जगामध्ये सर्वात जास्त वेळ आपण कशा मध्ये घालवत असतो? आपल्यालाही हे जाणून आश्चर्य वाटेल. की फेसबुक वरती प्रोफाईल चेक करत आपला वेळ जात असेल. परंतु हे अजिबात खरे नाही. जगात सर्वात अधिक वेळ जातो तो स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहण्यासाठी. अलीकडच्या काळात मोबाईलचा फ्रंट कॅमेरा अशासाठी एक नवा पर्याय झाला आहे. तो सुद्धा आरश्या सारखेच काम करत असतो.एवढेच नाही तर आपण एक दुसऱ्याला सुद्धा आरसा मध्येच निहाळत असतो.
समजा आपण एखाद्या ट्राफिक सिग्नल मध्ये अडकून पडलो आहोत. अशावेळी आपण काय करतो, तर आपल्या गाडीच्या आरशामध्ये मागे थांबलेल्या गाड्या आपण पाहत असतो. चला आपण या गोष्टीचा पुढे जाऊया. तर आपल्याला असे वाटेल की या ठिकाणी आरशा बाबतच का चर्चा सुरू आहे . कारण आरसा हा केवळ आपल्याला न्याहाळण्यासाठी उपयोगी पडत नाही तर आपल्या घरातील सजावटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. चला तर आपण घरातील सजावटीमध्ये आरशाचे पाच उपयोग कसे करता येतील हे पाहूया.
योग्य ठिकाणी आरसा लावा
आरशाचा मुख्य उपयोग काय असतो हे माहीतच आहे.आपल्या हिशोबनुसार आरशाला आपण जागा देत असाल. परंतु या ठिकाणी आपण सुरुवातीला आरसा यासाठी कोणत्या ठिकाणी जागा असावी याबाबत बोलूया. कारण यातून ही आरशाचे महत्व अधिक स्पष्ट होते. जेव्हा आपण आरसा योग्य ठिकाणी लावतो तेव्हा आपल्या खोलीला एक चांगला लूक देण्याचे काम करत असतो. आपली खोली कॉम्पॅक्टर दिसण्यासाठी किचनच्या कपाटावर अथवा बेडरूममधील कपाटावर आपण हा आरसा लावू शकतो.
उजेडाने घरामध्ये आणखीन शोभा वाढते
आरसा हा प्रकाश परावर्तित करण्याचा गुणधर्म पाळत असतो जर आपल्या घरामध्ये खिडकी कमी असतील आणि आपल्याला जर नैसर्गिक उजेड कमी मिळत असेल तर अशावेळी आपणास ज्या ठिकाणी उजेडाची गरज आहे त्या ठिकाणी आरशाचा उजेड परावर्तित करू शकतो. जर आपण खिडकीच्या समोरच आरसा लावला तर अधिक चांगल्या पद्धतीने प्रकाश परावर्तित होऊन घरामध्ये अधिक उजळपणा दिसून येतो.
आरशाला सजवा आपल्या घराची शोभा वाढवेल..
आरसाच्या भवतीने आपण फेअर लाईट ची माळ लावू शकतो. जर आपण अशा पद्धतीने या आरशाला सजवले तर त्याचा उपयोग रात्रीच्यावेळी अधिकच चांगला होईल. याच बरोबर घरातील सजावटीचा एक वेगळा अनुभव आपण यातून घेऊ शकतो.
सजावट आणि उपयुक्त वापर
आपण घरातील हॉलमध्ये सुद्धा आरसा लावू शकतो. यामुळे जेव्हा आपण तयार होऊन बाहेर जात असतो त्यावेळी आपण आरशामध्ये सहजपणे आपली प्रतिमा पाहू शकतो. याशिवाय आपण आपल्या टेबलवर सुद्धा आरसा लावू शकतो. जो घराची शोभा वाढवण्यासाठी ही अत्यंत आकर्षक असे असते. त्याच बरोबर आपल्याला हा आरसा उपयोगीही पडेल. आरशाच्या पृष्ठभागावर आपण आपल्या किल्ल्या अथवा सुट्टी पैसे सुद्धा ठेवू शकतो
सिलिंगला आरसा लावून त्याचा लुक पहा
जर खोलीला एका वेगळ्या पद्धतीने सजावट करण्याचा माणस मनामध्ये असेल तर आपण आपल्या बेडरुमच्या सिलिंग वरती आरसा लावून पहा. आपल्याला त्या खोलीतील अंतरंग पाहता येईल आणि एक वेगळी उमेद आपल्यामध्ये निर्माण होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.