महिलांनो, बेल्ट लूकने मिळेल तुमच्या व्यक्तीमत्वाला हटके लूक|Fashion Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

belt look
महिलांनो, बेल्ट लूकने मिळेल तुमच्या व्यक्तीमत्वाला हटके लूक|Fashion Tips

महिलांनो, बेल्ट लूकने मिळेल तुमच्या व्यक्तीमत्वाला हटके लूक

पूर्वी बेल्ट् ही 'ऍक्सेसरी' केवळ पुरुषांसाठी (Men Fashion) होती.त्यावेळी मुली फक्त पाश्चिमात्त्य कपड्यांबरोबर बेल्ट वापरायच्या जीन्स बरोबरच ते स्कर्ट आणि ड्रेससेसशी जुळले. परंतु आजकाल पारंपारीक कपड्यांसमवेत बेल्ट घालण्याची फॅशन झपाट्याने पसरत आहे. हल्ली एक्टरेसेस आपल्या लेहेंग्यासोबत मॅचिंग बेल्ट वापरून स्टेटमेंट तयार करतायेत.

हेही वाचा: मुलींनो, ऑफिसला जाताना वापरा 'या' प्रकारचे कपडे

देसी लुक मध्ये मॉडर्न टच हवा असेल तर तुम्हीही पारंपरिक कपड्यांबरोबर असे मॅचिंग बेल्ट वापरू शकता. जर तुम्हाला साडी सोबत बेल्ट घालायचा असेल तर तो कमरेच्या वरच लावा. हल्ली बाजरात तुम्हाला अनेक प्रकारचे रंगीबेरंगी फॅशनेबल बेल्ट्स मिळतील .तुमच्या कपड्यांनुसार त्यांना स्टाईल करा.

ऑरगेंझा साडी सह घट्ट चमकणारा बेल्ट एकदम अप्रतिम दिसेल.कपड्यामध्ये इतर काम असल्यास बेल्ट त्याच्याशी मिळते जुळते ठेवा. हेवी वर्क साठी कमी नक्षीचा बेल्ट योग्य राहील. लेहेंग्यासोबत स्टाईल करताना बेल्टवरील वर्क लेहेंग्यावरील वर्कशी जुळवण्याचा प्रयत्न करा.जेणेकरून ते अगदी शोभून दिसेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही लेहेंग्यासह कंबरपट्टा म्हणुन देखील बेल्ट चा वापर करू शकता.अश्याप्रकारे तुम्ही तुमच्या 'देसीलुक' ला ही मॉडर्न टच देऊ शकता.

हेही वाचा: Turtle Neck Fashion | असा बदला तुमचा फॅशन गेम! नेहमी रहा अप टू डेट

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top