मुलींनो, ऑफिसला जाताना वापरा या प्रकारचे कपडे| Trendy Office Wear | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

office wear
मुलींनो, ऑफिसला जाताना वापरा या प्रकारचे कपडे| Trendy Office Wear

मुलींनो, ऑफिसला जाताना वापरा 'या' प्रकारचे कपडे

कोरोनाच्या सावटाखाली अनेकांनी दोन वर्ष घरातच घालवली. लोकांनी आता ऑफिसला (Office) जायला सुरूवात केली आहे. पण ऑफिसला जाणं त्यांना थोडं जड वाटतंय. तरीही जाण्यावाचून पर्याय नाहीये. गेल्या दोन वर्षांत फॅशन ट्रेंडमध्ये (Office Fashion Trend) बराच फरक पडला आहे. अशा परिस्थितीत, वॉर्डरोबमध्ये समाविष्ट असलेले कोणते आउटफिट तुम्हाला ऑफिस वेअरमध्ये ट्रेंडी लूक देतील हे पाहणे गरजेचे आहे. तुम्ही अशाप्रकारचे कपडे ऑफिसला जाताना वापरू शकता.

Monochrome Dress

Monochrome Dress

मोनोक्रोम ड्रेस (Monochrome Dress)

यावर्षी मोनोक्रोम वर्क ड्रेस ट्रेंडमध्ये असेल. या प्रकारच्या ड्रेसमुळे लोकांना स्टायलिश आणि स्लिम लुक मिळेल. घरातील कामे करताना लोकांचे वजन वाढले आहे, त्यामुळे ऑफिस वेअरमध्ये मोनोक्रोमचा ट्रेंड राहील.

हेही वाचा: दिवसाची सुरूवात प्रसन्न करायचीय! ही पाच काम कराच

Casual Wear

Casual Wear

कॅज्युअल ड्रेस (Casual Wear)

ऑफिसमध्ये लोकं दिवसातला बराचसा वेळ घालवात. त्यामुळे अनेकजण आरामदायक आणि स्टायलिश लुकसाठी कॅज्युअल कपडे निवडतात. यंदा हिवाळ्यात तुम्ही कॅज्युअल लुकसाठी स्वेटशर्ट वापरू शकता. ब्लेझर आणि ओव्हरसाईज कोटचा ट्रेंड यावेळीही ट्रेंडमध्ये आहे.

हेही वाचा: पालकांनो, तुमच्या अल्पवयीन मुलांना किती स्वातंत्र्य द्याल?

Paints

Paints

पॅंट्स (Paints)

जींन्सच्या बरोबरीने वाइड लेग पॅंट फॅशनमध्ये आहेत. या घातल्यावर आरामदायी असल्यामुळे, 2022 मध्येही, लोकांना रुंद लेग पँट घालायला आवडेल.

हेही वाचा: तिशीच्या आत लग्न कराल तर फायद्यात राहाल, वाचा ५ फायदे

mask

mask

मास्क (Mask)

कोविडचा धोका अजून टळलेला नाही. अशा परिस्थितीत फेस मास्क घालणे गरजेचे आहे. तुम्ही यात विविध रंग, प्रिंट्स, मॅचिंग आणि कॉन्ट्रास्टिंग आउटफिट्स असलेले मास्क वापरू शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womenofficeOffice Work
loading image
go to top