चेहऱ्यापासून तर केसांपर्यंतच्या सौंदर्यासाठी रामबाण उपाय, फक्त दोन थेंब मध

benefits of honey for skin and hairs with all beauty nagpur news
benefits of honey for skin and hairs with all beauty nagpur news

नागपूर : मधामुळे चेहऱ्याचा रंग उजळतो आणि केस चमकदार बनतात हे तुम्हाला माहितीच असेल. मात्र, मध फक्त पोटात घेतल्यामुळे त्याचा परिणाम जाणवतो, असे अनेजकण मानतात. पण, नेहमी असे होत नाही. सुंदरतेसाठी असलेल्या संसाधनामध्येही या मधाचा उपायोग केला जातो. मधामध्ये सौंदर्यीकरणाचे गुण आहेत. आम्ही सांगितल्याप्रमाणे दररोज तुम्ही मधाचा वापर केला, तर नक्कीच तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळेल आणि त्वचा तजेलदार देखील दिसेल.

मुरुम आणि त्वचा चमकण्यासाठी -
तुमच्या चेहऱ्यावर कुठले डाग आले असतील किंवा तुम्ही मुरुमापासून त्रस्त असाल तर मधाचा वापर केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण अशतात. त्यामुळे चेहऱ्यावर असणाऱ्या विषाणूंना मारण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर मध लावल्याने चेहरा मॉश्चराईज होतो. त्यामुळे मुरुमापासून दिलासा मिळतो. तसेच मधामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे जळलेली त्वचा देखील ठीक होण्यास मदत होते. तुम्ही दररोज मधाचा वापर करणार असेल तर यामध्ये अॅलोविरा जेल घाला.

त्वचेला एक्सफॉलिएट करण्यासाठी -
मधामध्ये अँटी-एजिंग एजेंट असतात. त्यामुळे त्वचा उजाळण्यास मदत होते. चेहऱ्यावर स्क्रब करण्यासाठी मधाचा वापर होतो. त्यामुळे त्वचेवरील रोमछिद्र पूर्णपणे स्वच्छ होतात आणि रिंकल्सपासून दिलासा मिळतो. एक टेबलस्पून मधामध्ये दोन टेबलस्पून ब्राऊन शुगर घाला. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाका. त्यानंतर त्वचेला ओलसर करून हे स्क्रब चेहऱ्यावर लावा. एक मिनिटांपर्यंत स्क्रबिंग झाल्यानंतर त्याला पूर्णपणे कोरडे होऊ द्या. त्यानंतर थंड्या पाण्यानी चेहरा धुवा.

केसांना कंडीशनिंग करण्यासाठी -
मधामध्ये मॉश्चराईजिंगचे गुण असतात हे आधीच सांगितलं आहे. त्यामुळे मधाचा वापर मॉश्चराईज म्हणून केला जातो. मधामध्ये काही नैसर्गिक तत्व मिसळून त्याला केसांवर लावल्याने केसांना पोषण मिळते. यासाठी दो टेबलस्पून मधामध्ये तीन ते चार टेपलस्पून नारळाचे तेल घाला. त्यानंतर ३० मिनिटांनंतर केस थंड्या पाण्यानी धुवा. यामुळे तुमचे केस छान मुलायम होतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com