esakal | आहारवेद करवंद; ८ शारीरिक समस्यांवर मिळेल कायमचा तोडगा

बोलून बातमी शोधा

karvand

आहारवेद करवंद; ८ शारीरिक समस्यांवर मिळेल कायमचा तोडगा

sakal_logo
By
शर्वरी जोशी

पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी ८०-९० च्या दशकात उन्हाळा लागला की दारोदारी डोंगरची काळी मैना विकायला यायची. डोंगरची काळी मैना म्हणजे आपली करवंद (carissa carandas). एका टोपलीमध्ये असंख्य लाल-काळी अशी लहान लहान टपोरी करवंद छान ऐटीत बसलेली असायची. पळसाच्या पानांची एक लहानशी पर्स करुन हे करवंद विकली जायची. त्याकाळी आवडीने खाल्ली जाणारी करवंद आता मात्र, फार दुर्मिळ झाली आहेत. बाजारात फार कमी वेळा करवंद पाहायला मिळतात. चवीने आंबट- गोड असणारे करवंद आरोग्यासाठीही (health)तितकेच फायदेशीर आहेत. त्यामुळेच करवंदाचे गुणकारी फायदे कोणते ते पाहुयात. (benefits of eating carissa carandas)

'खट्टा मीठा' या नावानेदेखील ओळखला जाणारा हा रानमेवा डोंगरकड्यांवर मिळतो. असंख्य काट्यांमध्ये लपून बसलेल्या करवंदामुळे अनेक शारीरिक व्याधी बरी होतात. त्यामुळेच प्रथम करवंदाचे औषधी गुणधर्म कोणते ते पाहुयात.

हेही वाचा: आंबा गोड आहे की नाही कसं ओळखाल? जाणून घ्या सोपी युक्ती

१. रक्ताताची कमतरता निर्माण झाल्यामुळे जर अशक्तपणा जाणवत असेल तर करवंद फायदेशीर ठरतात. दररोज एक मूठभर करवंद खाल्ली तर रक्ताची कमतरता दूर होते.

२. त्वचाविकार बरे होतात.

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

४. उष्णतेचे विकार बरे होतात.

५. उलटी,मळमळ असे त्रास जाणवत असतील तर करवंद खावीत.

६. रक्तवाहिन्यांमधील चरबीचे प्रमाण कमी होते.

७. पोटाचे विकार बरे होतात. तसंच मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.

८. अपचनाचा त्रास होत असेल तर करवंदाचं सरबत प्यावं.