आंबा गोड आहे की नाही कसं ओळखाल? जाणून घ्या सोपी युक्ती

hapus.jpg
hapus.jpg

उन्हाळा हा महिना विविध कारणांसाठी खास आहे. या महिन्यात बोरं, जांभूळ, कैऱ्या, आंबे अशा अनेक फळांची रेलचेल असते. त्यातच आंबा अनेकांच्या जीव की प्राण आहे. त्यामुळे बाजारात आंबे दिसायला लागले की, ते खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. आंब्यांचे विविध प्रकार आहेत. यात पायरी, तोतापुरी हे आंबे सरार्स मिळतात. परंतु, ग्राहकांची खरी मागणी ही हापूस आंब्यालाच असते. या आंब्यांसाठी लोक हजारो रुपयेदेखील खर्च करण्यासाठी तयार असतात. मात्र, आंबे खरेदी केल्यानंतर अनेकदा ते खराब निघतात. त्यामुळे सहाजिकच आंब्यांवर खर्च केलेले पैसे वाया जातात. परंतु जर आंबे खरेदी करण्यापूर्वीच ते चांगेल आहेत की नाही? किंवा ते गोड आहेत की आंबट हे समजलं तर? यासाठी एक सोप्पी युक्ती आहे. त्यामुळे आंबे खरेदी करण्यापूर्वीच ते गोड आहेत की आंबट हे लगेच आपल्या लक्षात येईल.

आंबा खरेदी करतांना तो चांगला आहे की नाही हे ओळखायची सगळ्यात सोप्पी पद्धत म्हणजे त्याचा वास.  आंबा विकत घेतांना कधीही त्याचा वास नेमका कसा आहे हे तपासून पाहावं. जर आंब्याचा वास गोड आणि मधूर येत असेल तर तो आंबा गोड आहे असं समाजवं. परंतु. जर त्या आंब्यातून आंबट किंवा एल्कोहोलिक वास येत असेल तर तो आंबा आंबट आहे. तसंच तो ताजादेखील नाही हे लक्षात येतं. विशेष म्हणजे जर आंबा थोडासा दाबून पाहिलात आणि तो सॉफ्ट वाटला तर तो खरेदी करु नये. कारण, असे आंबे आतून खराब असतात.

आंब्यांची साठवणूक कशी कराल?

जर आंबे कच्चे असतील तर ते रुम टेंम्परेचरवर ठेवावेत. तसंच जर आंबे लवकर पिकावे असं वाटत असेल तर त्यांना पेपर बॅग किंवा पेंढ्यात ठेवावेत.  विशेष म्हणजे आंबा फ्रिजमध्येदेखील बराच काळ राहू शकतात.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com