Bhogi 2025 Wishes: Sakal
लाइफस्टाइल
Bhogi 2025 Wishes: संक्रातीच्या आदल्या दिवशी मराठी अंदाजात द्या भोगी सणाच्या खास शुभेच्छा
Bhogi 2025 Wishes: मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या सणाला खास बनवण्यासाठी मराठीतून हटके शुभेच्छा देऊ शकता.
Bhogi 2025 Wishes: नव वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते. यंदा १४ जानेवारीला संक्राती साजरी केली जाणार आहे. तसेच आदल्या दिवशी भोगी सण साजरा कला जातो. भोगीच्या दिवशी इंद्र देवाला स्मरून पूजा केली जाते. भोगीच्या दिवशी विवाहित महिला सकाळी स्नान करून पूजा करतात. तसेच शेतकरी रब्बी हंगामातील पीकाचे पूजा करून वर्षभर घरात धान्याची भरभराट होऊ दे यासाठी प्रार्थना केली जाते.
आजच्या दिवशी हिवाळ्यात मिळणाऱ्या पावटा, शेंगा, घेवडा, वांगे, हरभरे यासारख्या विविध भांज्यापासून चवदार आणि आरोग्यदायी भाजी बनवली जाते. तसेच तीळ लावून बाजरीची भाकर बनवली जाते. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पुढील प्रमाणे मराठीतून हचके अंदाजात शुभेच्छा देऊ शकता.

