
Bipasha Basu Beauty Tips : चाळीशी उलटल्यावर आई झाली तरी मात्र तारुण्य तिशीतलं, कसं? वाचा ब्युटी सीक्रेट
Bipasha Basu Birthday : हॉरर फिल्म क्विन अशी बॉलीवूडमध्ये खास ओळख असणारी बिपाशा आज 44 वर्षांचा टप्पा पार करत वयाच्या 45शीत प्रवेश करतेय. आज बिपाशाचा वाढदिवस. वयाच्या चाळीशीनंतर आई झालेली बिपाशा बघाल तर सौंदर्याच्या बाबतीत ती तिशीतल्या तरुणींनाही मागे टाकते. तेव्हा आज तिच्या वाढदिवशी आप तिच्या ब्युटी सीक्रेटबाबत जाणून घेऊयात.
काय आहे बिपाशाच्या सौंदर्याचं रहस्य?
बिपाशाच्या तरूण त्वचेमागे अनेक उपाय आहेत. बिपाशा सनस्क्रिीन लावशिवाय कधीच घराबाहेर पडत नाही. ती रोज रात्री डोळ्याभोवती बदामाच्या तेलाची मालिश करते आणि काम करत नसताना जड मेकअप करणे टाळते. बिपाशा सतत केसांच्या तेलाचा मसाज करते. तसेच ती केसांची निगा राखण्यासाठी चांगले हेअर कंडिशनर आणि वारंवार स्पामध्ये करण्यात भरपूर पैसे घालवते.

बिपाशा बासू जीम फ्रीक नसून निरोगी जीवनशैलीवर विश्वास ठेवते. तिच्या दिनचर्येमध्ये मुख्यतः कार्डिओ व्यायाम, झुंबा दिनचर्या आणि पोहणे समाविष्ट आहे! ती योग देखील करते ज्यात दररोज १०८ सूर्यनमस्कार असतात.
बिपाशाच्या कठोर व्यायाम योजनेनंतर तिचा डाएटही ठरला असतो.
बिपाशाचा आहार
न्याहारीपूर्वी: एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस भिजवलेले बदाम आणि चहा.
न्याहारी: 6 अंड्याचा पांढरा भाग, मशरूम, टोस्ट, फळे आणि काही दलिया.
दुपारचे जेवण: सोया चपातीसह डाळ, भाज्या, कोशिंबीर, मासे किंवा चिकन.
रात्रीचे जेवण: ऑलिव्ह ऑईलमध्ये तळलेल्या भाज्या, हिरवे कोशिंबीर, मासे किंवा चिकन सोबत थोडी मिष्टान्न.