Birds Suicide Place : भारतात या ठिकाणी आहे पक्षांचा सुसाईड पॉईंट, वैज्ञानिक म्हणतात की!

वेगाने उड्डाण करताना ते मुद्दाम इमारतींवर किंवा उंच झाडांवर आदळतात आणि क्षणार्धात मरतात
Birds Suicide Place
Birds Suicide Placeesakal

Birds Suicide Place :

जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत विज्ञानालाही बुचकळ्यात टाकतात. आजवर तुम्ही माणसांच्या आत्महत्या करण्याचे स्पॉट पाहिले असतील. पण भारतात असेही एक ठिकाण आहे जिथे पक्षी येऊन आत्महत्या करतात. होय खरंच अशी जागा अस्तित्वात आहे.

तुमचा विश्वास बसणार नाही, पण आसाममधील दिमा हासो जिल्ह्यातील टेकड्यांमध्ये असलेल्या जटिंगा व्हॅलीला पक्ष्यांचे सुसाइड पॉइंट म्हटले जाते. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पक्ष्यांच्या आत्महत्यांमुळे जटिंगा गाव प्रसिद्धीच्या झोतात येते. (Birds Suicide Place )

Birds Suicide Place
Munia Bird : पावसाळयात दरवर्षी आमच्या घरी येणारी माहेरवाशीण मुनिया...

सप्टेंबरमध्ये स्थानिक पक्षीच नव्हे तर पाहुणे म्हणजेच स्थलांतरित पक्षीही आत्महत्या करतात. या कारणास्तव जटिंगा गाव अत्यंत रहस्यमय मानले जाते. पक्ष्यांना विशिष्ट हंगामात आणि विशिष्ट ठिकाणी असे करण्यास प्रवृत्त करण्याचे कारण काय आहे याबद्दल शास्त्रज्ञांनी बराच शोध घेण्याचा प्रयत्न केला.

आत्महत्या करण्याची ही प्रवृत्ती मानवांमध्ये अधिक सामान्य आहे. अनेक वेळा परीक्षेत किंवा नोकरीच्या निकालात किंवा नात्यात नापास झाल्यामुळे लोक आत्महत्या करतात. पण पक्ष्यांच्या बाबतीत ही गोष्ट वेगळी ठरते.

पक्षी असल्याने ते इमारतीवरून उडी मारून स्वत:चा जीव घेऊ शकत नाहीत. परंतु वेगाने उड्डाण करताना ते मुद्दाम इमारतींवर किंवा उंच झाडांवर आदळतात आणि क्षणार्धात मरतात. हे केवळ काही लोकांसाठीच नाही तर दरवर्षी सप्टेंबर महिन्यात हजारो पक्ष्यांसाठी घडते.

Birds Suicide Place
Bird flu H5N1: कोरोनापेक्षा १०० पटींनी प्राणघातक आहे बर्ड फ्लू; अर्ध्याहून अधिक रुग्णांचा झालाय मृत्यू! नव्या महामारीचा धोका?

आत्महत्येची वेळही आहे निश्चित

हे पक्षी हे फक्त संध्याकाळी 7 ते 10 च्या दरम्यान आत्महत्या करतात. तर सामान्य हवामानात हे पक्षी दिवसा बाहेर पडतात आणि रात्री घरट्यात परततात. मग एक-एक महिनाभर अंधार पडला की हजारोंच्या संख्येने घरट्यातून बाहेर पडून आदळून मरतात.

या आत्महत्येमध्ये स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या 40 प्रजातींचा सहभाग आहे. इथून गेल्यावर परदेशी स्थलांतरित पक्षी त्यांच्या देशात परतत नाहीत. रात्रीच्या वेळी या खोऱ्यात जाण्यास बंदी आहे.

Birds Suicide Place
Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

शास्त्रज्ञांचा असाही तर्क

अनेक पक्षी शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, या दुर्मिळ घटनेचे कारण चुंबकीय शक्ती आहे. दमट आणि धुक्याच्या वातावरणात वारे वेगाने वाहतात तेव्हा रात्रीच्या अंधारात पक्षी दिव्यांभोवती उडू लागतात. प्रकाशामुळे ते पाहू शकत नाहीत आणि वेगाने उड्डाण करत असताना ते कोणत्याही इमारतीवर किंवा झाडावर किंवा वाहनांना धडकतात.

ही कारणे देत शास्त्रज्ञांनी सप्टेंबर महिन्यात बाहेरच्या लोकांना जटिंगामध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. प्रकाश टाळण्यासाठी सायंकाळच्या वेळी गाडी चालवण्यास मनाई होती, मात्र त्यानंतरही पक्ष्यांच्या मृत्यूचा हा क्रम विचित्र पद्धतीने सुरूच होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com