The Fascinating Origin of Mickey Mouse and the Disney World Empire
sakal
Mickey Mouse Day 2025: "मिस्का...मुस्का...मिकी माऊस!" वाचल्यावर आयडिया आलीच असले हे कोणत्या गाण्याचे शब्द आहेत. तर दरवर्षी १८ नोव्हेंबरला मिकी माऊस दे साजरा केला जातो. हा दिवस मिकी माऊसच्या निर्मितीचं स्मरण करण्यासाठी आणि १९२८ मध्ये पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येण्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाला माऊसचा वाढदिवस सुद्धा म्हणलं जातं. जरी एक ऍनिमेटेड कॅरॅक्टर असलं तर मिकी माऊस बरेच वर्ष डिस्नीचा चेहरा आणि प्रतीक म्हणून ओळखलं जात होतं.
याच मिकी माऊसमुळे वॉल्ट डिस्नीला जगभर प्रसिद्धी मिळाली. त्याच्या गोड हास्याने आणि साहसी व्यक्तिमत्वाने मिकी माऊस सर्वांचा आवडता झाला, ज्यामुळे वॉल्ट डिस्नीला आपले साम्राज्य उभे करण्याची प्रेरणा मिळाली आणि आज तो आनंद व कल्पनाशक्तीचा जागतिक प्रतीक आहे. त्यांची ही कहाणी कशी सुरु झाली ते पाहूया.