Board Exam Tips : मुलं बोर्डात येणारचं! आजच करा डाइट आणि लाइफस्टाइलमध्ये हे बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health tips

Board Exam Tips : मुलं बोर्डात येणारचं! आजच करा डाइट आणि लाइफस्टाइलमध्ये हे बदल

दरवर्षी ओळखीच्या कोणाची तरी मुलं १० वी १२ वी बोर्डात असतात. मार्च, फेब्रूवारीत येणाऱ्या परिक्षा म्हणजे वर्षभर मुलं आणि पालकांना टेंशन असते. त्यामुळे अशा मुलांनी अभ्यासासोबत आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. परीक्षा जवळ आल्यावर मुले त्यांच्या अभ्यासात आणि तयारीत पूर्णपणे गुंतलेली असतात. अशा परिस्थितीत आरोग्य बिघडण्याची भीती असते.

मुलांच्या जीवनशैलीकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष देणे पालकांची जबाबदारी बनते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे मुलांना बोर्डाच्या परीक्षेपूर्वी शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहण्यास मदत होईल. ज्यामूळे ऐन परिक्षेच्या काळात मुलांचे आरोग्य बिघडणार नाही.

आहाराकडे लक्ष द्या

मुले अनेकदा परीक्षेच्या काळात खाणे-पिणे टाळतात. जास्त खाल्ल्याने झोप येते म्हणून ते कमी खाण्याचा प्रयत्न करतात. अशावेळ ते अनेक आवश्यक पोषक आणि जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे बळी ठरू शकतात. त्यामूळे परिक्षेला सामोरे जाणाऱ्या मुलांना फळे, भाज्यांचे सूप, दूध, अंडी आणि मासे जरूर द्यावेत.

हेही वाचा: New Year 2023: पुणेकरांचा थर्टी फस्ट यंदा जोरात; 'वन डे परमिट'साठी लाखांवर अर्ज

कॉफीचा अतिरेक नकोच

झोपतून फ्रेश होण्यासाठी किंवा रात्रभर जागून अभ्यास करताना सतत कॉफी घेतली जाते. पण, जास्त कॉफी पिल्याने न्यूरोट्रांसमीटरवरही परिणाम होतो. त्यामुळे भूक न लागणे, पचनक्रिया वाढणे आणि पोटाच्या समस्या निर्माण होतात. म्हणूनच मुलांना जास्त कॉफी पिऊ देऊ नका.

हेही वाचा: Abdul Sattar News : सत्तारांच्या अडचणी वाढणार? राजीनाम्याची मागणी होताच झाले 'नॉट रिचेबल'

पुरेशी झोप घ्या

अभ्यासासाठी जागरण गरजेचे असले तरी मुलांचा मेंदू शांत राहण्यासाठी मुलांना चांगली झोपही हवी. पुरेशी झोप मुलाच्या मेंदूचे आरोग्य वाढवते. जो काही अभ्यास केला तो लक्षात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे अभ्यासासोबतच मुलांच्या झोपेकडेही विशेष लक्ष द्या.

काळजीमुक्त राहण्यासाठी

कधीकधी मुलांना परीक्षेची अधिक चिंता असते. अशा स्थितीत सतत वाचन आणि नंतर विचार करणे त्यांच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचवू शकते. मुलाला अभ्यास करण्यासाठी जसा हट्ट केला जातो. तसेच, त्यांना 30 मिनिटे मोकळ्या हवेत खेळण्यासही सांगा. मुलांनी परिक्षेचे अतिरीक्त टेंशन घेतलेले असते त्यामूळे तूम्ही त्यांना ओरडून दबाव आणू नका. त्यांना टेंशनपासून दूर ठेवा.