Skin Care : बॉडी लोशन की बॉडी बटर, तुमच्या त्वचेसाठी काय आहे बेस्ट, जाणून घ्या

आपण सर्वजण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतो, परंतु त्वचेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, चेहऱ्याप्रमाणेच त्वचेलाही हायड्रेशनची गरज असते.
skin
skinsakal

आपण सर्वजण आपल्या चेहऱ्याची तर विशेष काळजी घेतोच, परंतु त्वचेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र, चेहऱ्याप्रमाणेच त्वचेलाही हायड्रेशनची गरज असते. यामुळे त्वचा मुलायम होते. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण यापैकी बॉडी लोशन आणि बॉडी बटर खूप लोकप्रिय आहेत.

लोक या दोन्ही गोष्टींना समान मानतात किंवा त्यांच्या त्वचेवर कोणतेही प्रोडक्ट लावतात. तर ही पद्धत चुकीची आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बॉडी बटर आणि बॉडी लोशनमध्ये काय फरक आहे, आणि तुमच्यासाठी काय बेस्ट आहे.

हे खरे आहे की बॉडी लोशन आणि बॉडी बटर दोन्ही त्वचेला हायड्रेट करतात, परंतु प्रत्यक्षात या दोन्हीमध्ये शरीराला हायड्रेट करण्याचे वेगवेगळे लेव्हल असतात. उदाहरणार्थ, बॉडी लोशनची कंसिस्टेंसी लाइट असते आणि ते त्वचेमध्ये सहजपणे शोषले जातात. त्यामुळे तुमची त्वचा खूप ड्राय नसेल तर तुम्ही बॉडी लोशन वापरू शकता. त्याच वेळी, बॉडी बटरचा टेक्स्चर थिक असतो, ज्यामुळे त्वचेला इंटेंस हायड्रेशन मिळते. त्यामुळे ज्या लोकांची त्वचा खूप कोरडी आहे त्यांनी बॉडी बटर वापरणे चांगले.

skin
Skin Care : ना केमिकलची भीती, ना खिशाला बसणार चाट.. घरच्या-घरी तयार करता येईल 'सनस्क्रीन'

जेव्हा तुम्ही स्वतःसाठी बॉडी लोशन किंवा बॉडी बटर वापरता तेव्हा तुम्ही स्किन कंडीशन आणि त्याच्या गरजांची देखील काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुमची त्वचा सामान्यपेक्षा थोडीशी ड्राय असेल तर तुम्ही दैनंदिन वापरासाठी बॉडी लोशन वापरू शकता. कोरड्या त्वचेसाठी हा एक चांगला पर्याय आहे. दुसरीकडे, जर तुमची त्वचा खूपच ड्राय असेल किंवा तुम्हाला एक्जिमा किंवा सोरायसिस इत्यादी समस्या असतील तर बॉडी बटर तुमच्या त्वचेसाठी चांगले असेल.

बॉडी लोशन आणि बॉडी बटर या दोन्हीमधील घटक वेगळे आहेत. उदाहरणार्थ, बॉडी बटरमध्ये शिया बटर, कोकोआ बटर किंवा अ‍ॅवोकॅडो ऑइल इत्यादींचा समावेश होतो, जे त्वचेला डीप मॉइश्चर देतात. बॉडी बटरमध्ये कमी केमिकल्स आणि प्रिजर्वेटिव्सचा वापर केला जातो, म्हणून ते संवेदनशील त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com