
बॉयफ्रेंडकडून महिन्याला तब्बल ८० लाख रुपये 'पगार' घेणारी गर्लफ्रेंड
आजकाल पोरींवर खर्च करणारे पोरं आपण पाहिले असतील पण महिन्याला तब्बल ८० लाख रुपये गर्लफ्रेंडवर खर्च करणारे लोकं आहेत हे आपण पहिल्यांदा ऐकलं असेल. तर आपल्याला प्रश्न पडला असेल की एवढा खर्च करणारा हा अवलिया कोण आहे? तर जगातील सगळ्यांत श्रीमंत खेळाडूंपैकी एक असणाऱ्या क्रिस्टियानो रोनाल्डो हा आपल्या गर्लफ्रेंडवर तब्बल ८० लाख रुपये उडवत असल्याची माहीती आहे. तो त्याच्या अलिशान लाइफस्टाइलविषयी नेहमीच चर्चेत असतो परंतु आता तो आपली गर्लफ्रेंड जॉर्जिया रोड्रिगेज हीच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका रिपोर्टनुसार रोनाल्डो तीच्या गर्लफ्रेंडला महिन्याला तब्बल ८० लाखांपेक्षा अधिक रुपये खर्च करण्यासाठी देतो. ब्रिटिश मिडियाने गर्लफ्रेंडला दिल्या जाणाऱ्या या पैशाला पगारासारखं असल्याचं सांगितलं आहे.
हेही वाचा: 'LOVE YOU बाबा' असा मेसेज पाठवत अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या
EI Nacional च्या रिपोर्टनुसार रोनाल्डो त्याच्या गर्लफ्रेंडला ८३००० पौंड म्हणजेच ८२ लाख भारतीय रुपये इतकी रक्कम मुलांच्या देखभालीसाठी आणि इतर खर्चासाठी देतो. त्याअगोदर त्याने तीला दीड कोटी किंमतीची एख कार भेट दिली होती. ते दोघं २०१७ पासून एकत्र राहत आहेत. दोघेही अलिशान जीवन जगत असून त्याची झलक त्यांच्या सोशल मीडियावर बघायला मिळत असते.
हेही वाचा: जगनमोहन रेड्डींचा मोठा निर्णय; आंध्रच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा
जॉर्जिया पेशाने मॉडेल असून तीने अनेक जाहीरातीसुद्धा केल्या आहेत. इंस्टाग्रामवर तीचे ३६ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्यांच्या फोटो आणि पोस्टवर लाखो चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट येत असतात. नुकतंच जॉर्जिनाच्या आयुष्यावर I Am Georgina नावाचा एक माहीतीपट आला असून त्यामध्ये तीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूवर भाष्य केलं आहे.
द मिररच्या रिपोर्टनुसार कधीकाळी स्टोअरमध्ये काम करणारी जॉर्जिना रोनाल्डो सोबत आल्यानंतर खूप बदलली. सध्या ती ४८ कोटींच्या बंगल्यात राहत आहे. तसेच ती ५५ कोटींच्या Yacht मध्ये प्रवास करते तसेच Bugatti, Rolls-Roycess आणि Ferrari सारख्या गाड्यांत फिरते. तीच्या बंगल्यात स्विमिंग पूल, जीम आणि फुटबॉल ग्राउंडसुद्धा आहे. रिपोर्टनुसार ती हवाई प्रवासासाठी वैयक्तिक जेटचा वापर करते.
Web Title: Boyfriend Spend 80 Lakh On Girlfriend As Salary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..