वाईन शॉपपासून प्रवासापर्यंत; निर्बंधांबाबत तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं

ऑफिसजवळ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येणं सक्तीचं आहे का?
break the chain
break the chain file photo

देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. यामध्येच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक दी चेन करण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. सोबतच राज्यात १४ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे यावेळी राज्यात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत नेमकं काय सुरु राहणार किंवा कोणती सेवा बंद राहणार याविषयी नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणूनच या काळात नेमक्या कोणत्या सोयीसुविधा सुरु राहतील यावर एक धावती नजर टाकुयात.

सध्याच्या काळात सगळ्यांना चिंतेत पाडणारा प्रश्न म्हणजे लोकल ट्रेनचा आहे. सर्वसामान्यांना लोकलने प्रवास करता येणार की नाही हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्यामुळे या काळात लोकल सेवा किंवा अन्य वाहतूक कशा प्रकारे सुरु राहिल ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : सावधान! आठ पदार्थांमुळे कोरोनाचा धोका; इम्युनिटीवर करतात परिणाम

प्र. घरकाम करणारे, वाहनचालक, स्वयंपाकी प्रवास करु शकतात का?

उ. सध्या प्रत्येक शहरामध्ये रुग्णसंख्येची वेगवेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे या काळात स्थानिक प्रशासन जे निर्णय घेतील तो नागरिकांना ऐकावा लागेल.

प्र . महाराष्ट्रांतर्गत खासगी वाहनाने प्रवास शक्य आहे का ?

उ. अत्यावश्यक किंवा महत्त्वाचं काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याती मुभा आहे. जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडता येणार नाही. तसंच महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल तर सार्वजनिक वाहनाचाच वापर करावा लागेल.

प्र. मूव्हर्स एन्ड पॅकर्सच्या मदतीने घरसामान हलवू शकतात का ?

उ. या काळात खरं तर प्रवास करणे सक्तीने टाळण्यात आलं आहे. मात्र, अपवादात्मक परिस्थिती असेल तर स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित येईल.

प्र. वाईन शॉप्स आणि सिगारेट दुकाने उघडी असतील का ?

उ. नाही. वाईन शॉप्स किंवा अन्य मद्यपान, धुम्रपाना यांची दुकानं बंद राहतील. केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरु राहतील.

प्र. मॉर्निंग वॉक, सायकलिंग करता येईल का?

उ. नाही. कोरोनाची साखळी तोडायची असल्यामुळे बाहेर फिरता येणार नाही. अनेक जण मॉर्निंग वॉकला जातांना मास्क नाकाखाली घेतात. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक किंवा सायकलिंग करता येणार नाही.

प्र. सिमेंट, रेडी मिक्स, स्टील हे बांधकाम साहित्य खुलेपणाने मिळणार का ?

उ. आदेशात नमूद केल्याप्रमाणे संबंधित बांधकाम स्थळ सुरु ठेवण्यास परवानगी असेल तर बांधकाम साहित्य ने -आण करता येईल. साहित्यांची ऑर्डर ऑनलाईन किंवा दूरध्वनीवरून देता येईल. मात्र कुठलेही बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.

प्र. कुरियर सेवा सुरु राहील का ?

उ. फक्त आवश्यक कारणांसाठी कुरियर सेवा सुरु राहू शकेल

प्र. वस्त्रोद्योग आणि कपडे उद्योग सुरु ठेवता येईल ?

उ. नाही

प्र. १९ एप्रिल रोजी होणारी एमबीबीएस परिक्षा होईल का ?

उ. परिक्षा आयोजित करण्याविषयी संबंधित विभाग योग्य तो निर्णय घेईल मात्र विद्यार्थ्यांना हॉल तिकीट च्या आधारे ये-जा करता येईल तसेच प्रौढ व्यक्ती बरोबर असेल तरी मान्यता दिली जाईल.

प्र. ट्रॅव्हल कंपन्या व सेवा सुरु राहतील का ? ट्रॅव्हल, पासपोर्ट, व्हिसा सेवांचे काय ?

उ. ट्रॅव्हल कंपन्यां किंवा एजन्सीचं ऑफिस/ दुकान सुरु ठेवता येणार नाही. मात्र, ऑनलाइन स्वरुपात कामे सुरु ठेवू शकता. तसंच व्हिसा, पासपोर्ट सेवा , सर्व शासकीय सेतू केंद्रे,यांना शासनाचा एक भाग म्हणून मान्यता दिली आहे. त्याचंही काम ऑनलाइन स्वरुपात करता येऊ शकतं.

प्र. सर्वसामान्य नागरिक लोकलने प्रवास करू शकतात का ?

उ. नक्कीच प्रवास करु शकतात. मात्र, अत्यावश्यक सेवेत येणारे व आदेशात नमूद करण्यात आल्याप्रमाणे वैध कारणांसाठीच हा प्रवास करता येऊ शकतो. अन्यथा प्रवास करता येणार नाही.

प्र.खासगी वाहने कर्मचाऱ्यांना घेऊन कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी ये जा करू शकतील ?

उ. जी कार्यालये किंवा आस्थापना आवश्यक गटात येत असतील किंवा ज्यांना निर्बंधामधून वगळे असेल तेच प्रवास करु शकतात.

प्र. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेचे काय ?

उ. आवश्यक सेवा असल्याने त्या सुरूच राहतील आणि त्यातून कुणीही प्रवास करू शकेल.

प्र. ऑफिसच्या जवळ राहणारे कर्मचारी कंपनीमध्ये येऊ शकतात का?तसंच कामाच्या ठिकाणापासून लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनीदेखील ऑफिसला यावं लागेल का?

उ. १३ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, आवश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या, कारखाने यांनाच केवळ परवानगी आहे. त्यामुळे तेथील कामगार व कर्मचारी ये जा करू शकतात. इतर कारखाने व उद्योगांच्या बाबतीत ज्या कामाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररित्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केलेली असेल आणि तिथून त्यांच्या प्रवासाची स्वतंत्र व्यवस्था असेल ते उद्योग सुरु राहू शकतात.

प्र. पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा पेट्रोल पंप्स, एव्हिएशन स्टेशन्स, एलपीजी बॉटलिंग प्लांट हे आवश्यक सेवेत येतात का ?

उ. हो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com