हे आहेत ७ संकेत जे तुम्हाला सांगतील तुमच्या ब्रेकअपची वेळ जवळ आली आहे

breakup time seven signs indicate compare lifestyle marathi news
breakup time seven signs indicate compare lifestyle marathi news
Updated on

कोल्हापूर: जर आपण आपल्या नात्या बद्दल विचार करून चांगले वाटत असेल, आनंदी असल्याचा फील घेत असाल  तर तुम्ही योग्य व्यक्तीच्या सहवासात आहात .परंतु  तुम्हाला जर राग येत असेल मनामध्ये तनाव निर्माण होत असेल किंवा दुखी होत असाल तर  तुम्ही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची  गरज आहे . जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा एकमेकाबद्दल फारसे काही  माहीत नसते. हळूहळू आपल्याला समजून येते की समोरची व्यक्ती कशी आहे. तेव्हा असे वाटते की या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा साथीदार न बनवणे चांगले. दोघांचे विचार आणि राहण्याची पद्धत वेगळी होत असेल किंवा अनेक गोष्टींमध्ये दोघांचे मतभेद असतील अशावेळी सुद्धा सुरुवातीला  एक दुसऱ्याला पसंद ही करतो. परंतु नंतर आपल्या नात्यातील गोडवा कमी होण्यास सुरुवात होते. अनेक वेळा एकत्र राहणे सुद्धा आपल्याला कंटाळवाणे वाटू लागतो. अशा वेळी आपण आपल्या नात्याला अनेक प्रकारे वाचण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रत्येक वेळी आपण यामध्ये अयशस्वी होतो. 


आपल्या  पार्टनर बरोबर छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होण्यास सुरुवात होते. आपले आयुष्यच अत्यंत नीरस वाटू लागते. अशावेळी एकमेकापासून दूर होणे चांगले ठरते. कधीकधी आपणाला समजून येते की आपल्या दोघांच्या मधील ताटातूट होण्याची वेळ आली आहे, परंतु या विचाराबद्दल आपणच आपल्या मनात संभ्रम निर्माण करतो आणि यातून आपण पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी आपण जबरदस्तीने हे नाते पुढे पुढे नेत राहतो.


अनेक वेळा अपमान होत असतानाही आपण या नात्याला सांभाळत राहतो .जर आपण आपल्या नात्याबद्दल विचार करून चांगले वाटत असेल, आनंदी आहात असे वाटत असेल तर तुम्ही योग्य व्यक्तीच्या सहवासात आहात असे समजावे. परंतु तुम्हाला जर राग येत असेल, मनामध्ये तनाव निर्माण होत असेल किंवा दुखी होत असाल  तर आपले भविष्याचे चित्र आपल्या समोरच उभे राहते.आपणही अशा स्थितीत असाल  तर आम्ही आपल्याला ही गोष्ट लक्षात आणून देतो की तुमच्यातील ब्रेकअप ची वेळ जवळ आली आहे याची  ही लक्षणे आहेत.

जोडीदार सोबत खुश नसणे

आयुष्यात  सुरुवातीच्या काळात आपल्याला सर्वच गोष्टी चांगल्या वाटत असतात. आपण एक दुसऱ्यांच्या बरोबर आनंदी राहत असतो. नंतर छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होऊ लागतात. यातून वारंवार भांडणे सुरू होतात अशावेळी आपण समजून घ्या की आपल्यामधील ब्रेकअप ची वेळ आली आहे. परंतु असेही नाही की चांगल्या रिलेशन मध्ये जोडीदार मध्ये भांडणे होत नाहीत. परंतु ही भांडणे झाल्यानंतर अशा नात्यांमध्ये असुरक्षितता वाटत नाही.

जेव्हा नात्यामध्ये संशय निर्माण होतो

आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण प्रत्येक नाते हे वाईट असतेच असे नाही. जेव्हा आपल्या  नात्यांमध्ये संशय निर्माण होतो तेव्हा आपल्याला त्यापासून वाचवणे मुश्कील बनून जाते. या ना त्या मधून आपल्या मनामध्ये रोज काही ना काही विचार येण्यास सुरुवात होतात. अशावेळी आपल्या मनामध्ये चलबिचल निर्माण होते की आपण चुकीच्या माणसा बरोबर वेळ वाया घालवत आहोत. परंतु जेव्हा या आवाजाला तुम्ही दाबून ठेवता तेव्हा आपले मन सुन्न होऊन जाते. जेव्हा पश्चातापाची वेळ येते

जेव्हा आपल्याला समजत नाही की आपल्या नात्याबाबत काय करावे त्यावेळी आपण खूप खोलवर जाऊन विचार करण्याची आवश्यकता आहे. ब्रेकअप झाल्यानंतर आपली परिस्थिती काय असेल, कुठे आपण गडबड तर करून हा निर्णय घेत नाही ना, याबाबत ही विचार करण्याची गरज आहे. आपला जोडीदार आपल्यासाठी किती आवश्यक आहे. आणि आपल्या आयुष्यात त्याचे अस्तित्व काय आहे याबाबत ही विचार होण्याची गरज आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण दूर गेल्यामुळे आपल्याला काहीही फरक पडणार नाही परंतु तुम्ही त्याला दुखी ही करू शकत नाही असा विचार येत असेल तर आपणच त्याबाबत निर्णय घ्यावा. परंतु आपण ठरवलं असेल की आता पुन्हा मागे वळून पाहायचेच नाही तर आपल्याला कोणत्याच गोष्टीचा विचार करण्याची गरज राहत नाही.


बरोबर असून सुद्धा नसल्यासारखे असेल तर...

जेव्हा जेव्हा मनामध्ये आपल्या नात्याचा विषय घेऊन अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि असे जर वारंवार होत असेल तर आपण समजुन जा की जी गोष्ट व्हायला नको ती होत आहे. समजा तुम्ही तुमच्या जोडीदार बरोबर सहवासात आहात आणि अशावेळी आपल्या मनामध्ये कोणत्या तरी अन्य व्यक्तीचे आठवण येत असेल तर अशा वेळी आपण काय करावे? याचा अर्थ असा नाही की आपले चरित्र खरच खराब आहे. ती एक आपल्या मनातील  भावना असते. जर आपल्या  मनात दुसऱ्यांच्या बद्दल विचार येत असेल तर म्ही दोघेही सुखी राहणार नाही.

जेव्हा आपल्यासाठीच चांगले वाटत नसेल तर

आपल्याला ही गोष्ट समजून आली पाहिजे की  आपल्याला या नात्यातून आनंद मिळतो की यातून आपल्यावर वाईट प्रभाव पडतो. आपला जोडीदार आपल्याला सपोर्ट करतो की आपल्यातील कमीपणा वारंवार दाखविण्याचा प्रयत्न करतो. खरेतर नात्यांमध्ये जोडीदार हे एक दुसर्‍याचे आत्मविश्वास आणि ताकद वाढवितात असतात. यातून एक चांगली भावना मनामध्ये रुजवत असतात. जर आपला जोडीदार आपल्यातील आत्मविश्वास कमी करत असेल आणि आपल्याला वारंवार दुःखी करत असेल तर समजून जावा की आपण त्याच्यापासून दूर जाणे चांगले आहे.

मित्रांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करू नका
तुम्ही जर तुमच्यातील नाते संपुष्टात आणण्याचा विचारा बाबत निर्णय घेऊ शकत नसाल आणि यासाठी जर तुम्ही जवळच्या मित्राची मदत घेत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जर तुमचे खास असणारी व्यक्ती तुमच्या नात्याबद्दल चांगली बोलत असेल आणि तुम्हाला हे नाते अधिक समृद्ध करण्यासाठी परिवर्तीत करीत असेल तर ही गोष्ट चांगली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला काही लोक जर आपले नाते तोडण्यासाठी आपल्या बरोबर गोष्टी करत असतील ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि खरेच अशा व्यक्ती जर आपल्यावर खरं प्रेम करत असतील तर त्या सांगत असलेल्या गोष्टीकडे गंभीरतेने पहा. 

कारणे स्पष्टपणे समजून घ्या

जर तुम्हाला वाटत असेल की नात्याच्या  निर्णयाबद्दल आपण खुपच घाई करत आहोत तर अशावेळी तुम्ही तुमच्या जोडीदारा बरोबर सहवासातच रहा. तुम्ही निर्णय घेण्यापूर्वी 2 लिस्ट तयार करा. एकामध्ये बरोबर राहिल्यानंतर आणि दुसऱ्या मध्ये ब्रेकअप घेतल्यानंतर होणाऱ्या परिस्थितीचा अभ्यास करा. 

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे.  अंमलबजावणी करण्याअगोदर याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com