esakal | Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला

Corona Effect: काठीच्या सहाय्याने घातल्या एकमेकांना वरमाला

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात पाय पसरले आहेत. यात भारतदेखील अपवाद नाही. आतापर्यंत देशात अनेकांना कोरोनाची लागण झाली असून या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून वारंवार त्रिसुत्री नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. यात सोशल डिस्टंसिंग बाळगणे, मास्क घालणे, हात सतत धुणे अनिर्वाय आहे. मात्र, एका लग्नात नवरदेव व नववधूने सोशल डिस्टंसिंगचं भलतच मनावर घेतल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनीही चक्क काठीच्या सहाय्याने एकमेकांना वरमाला घातली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेत आला असून अनेकांना हसू अनावर झालं आहे.

कोरोनाचं संकट असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. यात लग्न सोहळ्यात २५ माणसांची उपस्थिती निश्चित करण्यात आली असून सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं सक्तपणे सांगण्यात आलं आहे.त्यामुळे एका लग्नात नवरा-नवरीने कोविड गाइडलाइन्सच तंतोतंत पालन केल्याचं दिसून आलं.

हेही वाचा: जेवणापूर्वी श्वानांनी केली प्रार्थना;भन्नाट व्हिडीओ व्हायरल

आयपीएस ऑफिसर दीपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून यात स्टेजवर नववधू व नवरदेव दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या दोघांनी एकमेकांना चक्क काठीच्या सहाय्याने वरमाला घातल्या. त्यामुळे जुगाडवाली शादी असा हॅशटॅग ट्रेण्ड होऊन हा व्हिडीओ सध्या सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे.

loading image