esakal | जेवणापूर्वी श्वानाने केली प्रार्थना; भन्नाट व्हिडीओ व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

जेवणापूर्वी श्वानांनी केली प्रार्थना;भन्नाट व्हिडीओ व्हायरल

जेवणापूर्वी श्वानांनी केली प्रार्थना;भन्नाट व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
शर्वरी जोशी

लहान मुलं ज्याप्रमाणे मोठ्यांचं अनुकरण करत असतात त्याचप्रमाणे काही प्राणीदेखील मानवाचं अनुकरण करतात.सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. यामध्येच सध्या दोन चिमुकल्या श्वानांचा व्हिडीओ चर्चेत आला आहे. हे दोन्ही श्वान जेवणापूर्वी चक्क प्रार्थना करतांना दिसत आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमधून त्यांच्यातील संयम दिसून येत आहे.

आजही अनेक घरांमध्ये जेवणापूर्वी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ही प्रार्थना म्हटली जाते. लहान मुलांना तर ती हमखास शिकवली जाते. परंतु, हा महिलेने चक्क तिच्या श्वानांना ही प्रार्थना शिकवली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये श्वानांसमोर त्यांचं खास पेटफूड असतांनादेखील संपूर्ण प्रार्थना होईपर्यंत हे दोघं संयमाने बसले होते.

हेही वाचा: शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचं कसं ओळखाल?

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ही प्रार्थना म्हणत असून तिच्या बाजूला दोन पाळीव श्वान बसले आहेत. विशेष म्हणजे या महिलेची प्रार्थना पूर्ण होईपर्यंत दोघंही संयमाने एका जागी बसले आणि प्रार्थना संपल्यावरच त्यांनी त्यांचं पेटफूड खाण्यास सुरुवात केली.

दरम्यान, हा व्हिडीो वैशाली माथूर यांनी शेअर केला असून सध्या तो सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. इतकंच नाही तर आतापर्यंत त्याला २३०० पेक्षा जास्त लाइक्स आणि ४१ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

loading image