
WhatsApp wishes for Buddha Purnima 2025: वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा १२ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली अशी मान्यता आहे. गौतम बुद्धांनी बिहारमधील बोधगाया येथे बोधी वृक्षाखाली ध्यान केले. बुद्ध पौर्मिमा हा भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे. या दिवशी त्यांच्या शिकवणींचे स्मरण केले पाहिजे. तसेच या दिवसाला खास बनवण्यासाठी मराठीतून खास शुभेच्छा पाठवू शकता.