Buddha Purnima : बुद्ध पौर्णिमेला द्या अशा हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

बुद्ध जयंतीच्या हटके शुभेच्छांची लिस्ट वाचा...
Buddha Purnima
Buddha Purnimasakal

buddha-purnima : आज बुद्ध पौर्णिमा. वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. यालाच बुद्ध जयंती असे सुद्धा म्हणतात. आजच्या दिवशी संपुर्ण जगात बुद्ध जयंती उत्साहाने साजरी केली जाते.

या बुद्ध जयंतीला अनेकजण एकमेकांना बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा पाठवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच बुद्ध जयंतीच्या हटके शुभेच्छांची लिस्ट सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Buddha Purnima wishes quotes status messages )

१. बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
दुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा , हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

२. एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Buddha Purnima
Buddha Purnima 2023 : महाराष्ट्रात हजारो वर्षांपूर्वी बौद्ध धर्माचा प्रसार कोणी केला?

३. अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !

४. ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

५. जीवनात संकट अडीअडचणी समोर आल्यावर गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे शांत राहावे, विश्व वंदनीय महाकारूणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

६. शांतता ही नेहमी मनातुन प्राप्त होते तिचा बाहेर कुठेही शोध घेतल्यास ती कधीही प्राप्त होत नाही. बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima
Buddha Purnima : घरात भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवताय? पण जागा चुकवू नका! नाहीतर...

७. बुदध पौर्णिमेचा चंद्र आपल्या आयुष्यातील दुख दुर करून सुख शांती समाधान घेऊन येवो हीच माझी कामना, बुदध पौर्णिमेच्या मंगलमयी दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

८.  आज आहे बुद्ध पौर्णिमा ,आज चांगले वागण्याचा आणि चांगले बोलण्याचा संकल्प करूया.. बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

Buddha Purnima
Buddha Purnima 2023 : तब्बल 130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला दुर्मिळ योग, या राशीचे लोक होतील मालामाल

९. आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने संकल्प करा ,सत्याची साथ सदैव द्या . कायम चांगले बोला . सर्वांशी मानवतेने वागा. बुद्ध पौर्णिमेच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

१०. बुद्ध पौर्णिमेला आकाशात येणारा शितल चंद्र आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे करो आणि आपल्याला सुख समाधान आणि शांतता बहाल करो. आपणास व आपल्या कुटुंबास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com