- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
आज जागतिक योग दिवस. योग म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठी करण्याची आसने नव्हेत, तर योग म्हणजे आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य आणि उन्नतीसाठी असलेला एक सुवर्णमार्ग. योग म्हणजे एक जीवनशैली ज्यामध्ये आपण आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सतत कार्यशील असतो. म्हणूनच शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वाथ्यालाही तेवढेच महत्त्व आहे.