Car Care Tips: कारमध्ये अ‍ॅक्सेसरीज लावताय? 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, अन्यथा होईल मोठं नुकसान

Car Care Tips: कारमध्ये ॲक्सेसरीज बसवण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.
Car Care Tips:
Car Care Tips:Sakal

car care tips keep these things in mind while buying accessories for car

अनेक लोकांचे कार खरेदी करणे हे एक स्वप्न असते. कार खरेदी केल्यानंतर विविध प्रकारच्या ॲक्सेसरीज बसवतात. परंतू कधीकधी या अॅक्सेसरीज बसवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरेजेचे आहे. अन्यथा खुप मोठे नुकसान होऊ शकते. कारमध्ये ॲक्सेसरीज बसवण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

नियम

काही लोक त्यांच्या कारमध्ये अशा ॲक्सेसरीज लावतात, ज्यामुळे वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे पोलिस कारवाई होऊन दंडासोबत कार जप्त केली जाऊ शकते. म्हणून आपल्या कारमध्ये फक्त अशा ॲक्सेसरीज लावाव्या, जे कोणत्याही प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करत नाहीत.

राहा सतर्क

प्रत्येक प्रकारच्या कारसाठी बाजारात अनेक प्रकारच्या ॲक्सेसरीज मिळतात. पण काही लोक त्यांच्या कारमध्ये ॲक्सेसरीज बसवताना सुरक्षेकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्रवासा दरम्यान अपघाताचा धोका वाढतो. म्हणून, जेव्हा तुम्ही तुमच्या कारमध्ये ॲक्सेसरीज बसवता तेव्हा नेहमी सावध राहण्याची गरज असते. असे कोणतेही ॲक्सेसरीज कारमध्ये लावू नका ज्यामुळे कारच्या सुरक्षिततेला धोका वाढेल

Car Care Tips:
Electric Vehicle Range Tips: 'या' चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज

गुणवत्ता

जेव्हा तुम्ही तुमच्या कारमध्ये कोणत्याही प्रकारच्या ॲक्सेसरीज लावता तेव्हा त्या ॲक्सेसरीजचा दर्जा हलका नसावा हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे. नेहमी चांगल्या कंपनीचे सामान वापरावे. हे तुम्हाला आणि तुमची कार नेहमी सुरक्षित ठेवते.

दुकानाची काळजी घ्या

जेव्हा तुम्ही कारमध्ये ॲक्सेसरीज बसवता तेव्हा तुम्ही नेहमी चांगल्या दुकानातून काम करून घ्या. चांगल्या ठिकाणाहून काम करून घेण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त खर्च करावा लागेल, पण कोणतीही फसवणूक होणार नाही. बरेचदा लोक काही पैसे वाचवण्यासाठी लोक ॲक्सेसरीज कुठेही बसवतात. यामुळे अपघात होऊ शकते.

जास्त ॲक्सेसरीज लावणे टाळावे

अनेक वेळा लोक त्यांच्या कारमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त ॲक्सेसरीज बसवतात. असे केल्याने कारचे नुकसान होण्याचा धोकाही वाढतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही तुमच्या कारमध्ये ॲक्सेसरीज बसवायला जाल तेव्हा तुमची गरज आणि बजेट लक्षात घेऊन ॲक्सेसरीज बसवावे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com