या ५ कार हॅक्स करतील तुम्हाला थक्क, Cold Drink आणि Toothpaste च्या मदतीने दूर होतील या समस्या

कारच्या मेंटेनेंन्ससाठी मोठा खर्च करावा लागतो किंवा काही महागडे प्रोडक्टस् खरेदी करावे लागतात असा जर तुमचा समज असेल तर तो आजच दूर करा. कारण काही हॅक्स वापरून तुम्ही अगदी कमी खर्चात कारची काळजी Car Care घेऊ शकता
कारची देखभाल
कारची देखभालEsakal

कार खरेदी केल्यानंतर तिची योग्य प्रकारे काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. कारची योग्य देखभाल केल्यास तिचं आयुष्य वाढतं आणि अर्थातच प्रवास करण्याचा चांगला आनंद तुम्ही लूटू शकता. Car Maintenance Hacks in Marathi Clean your car with these products

कारचा मेंटेनेंन्स Car Maintenance करणं म्हणजे मोठं कठिण काम असा अनेकांचा समज असतो. मात्र जर तुम्ही काही सोप्या टिप्स वापरल्यात तर तुम्हाला कारची देखभाल करणं सहज शक्य होईल.

कारच्या मेंटेनेंन्ससाठी मोठा खर्च करावा लागतो किंवा काही महागडे प्रोडक्टस् खरेदी करावे लागतात असा जर तुमचा समज असेल तर तो आजच दूर करा.

कारण काही हॅक्स वापरून तुम्ही अगदी कमी खर्चात कारची काळजी Car Care घेऊ शकता.

डेंटची समस्या करा दूर

आपल्या कारवर एखादा लहानसाही डेंट आलेला कोणत्याही कार मालकाला पाहवत नाही. यामुळे कारची शोभा कमी होते. मात्र चिंता करू नका डेंट दूर करण्यासाठी तुम्हाला गॅरेजमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. गरम पाणी आणि बाथरुमसाठी वापरण्यात येणाऱ्या रबर सक्शन कपच्या मदतीने तुम्ही डेंट दूर करू शकता.

यासाठी डेंटच्या ठिकाणी व्हॅक्युम कप जोरात बसवा. त्यानंतर त्यावर गरम पाणी टाका. त्यानंतर सक्शन कप पुन्हा खेचून काढल्यानंतर कारचा पत्रा पुन्हा मूळ स्थितीत येईल आणि डेंट दूर होईल.

हे देखिल वाचा-

कारची देखभाल
Car Care Tips : गाडीतील Engine Oil बदलणं का आहे गरजेचं?

हेडलाइटस् स्वच्छ करणं

अनेक थंड हवेच्या ठिकाणी किंवा थंड वातावरणामध्ये हेडलाइट्समध्ये धुकं जमा होतं. धुक जमा झाल्याने हेडलाइट्सवर पाण्याचा थर जमा झाल्याने त्या ऑन केल्यानंतर पुरेसा उजेड न मिळाल्याने व्हिजिबिलीटी कमी होते.

ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला केवळ टूथपेस्ट आणि टूथब्रशची गरज भासणार आहे. यासाठी हेडलाइट्सवर बाहेरील बाजूने टूथपेस्ट लावून टुथब्रशच्या मदतीने काहीवेळ स्क्रब करा. त्यानंतर कोरड्या कापडाने टूथपेस्ट पुसून घ्या आणि कमाल पहा. कारच्या हेडलाइट्स पुन्हा नव्या सारख्या दिसू लागतील.

टायर स्वच्छ करण्यालसाठी सोपी ट्रिक

कारचे टायर तसचं रिम स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोकोकोला किंवा एखाद्या सॉफ्ट कार्बोनेटेड ड्रिंकचा वापर करू शकता. यासाठी सॉफ्ट ड्रिंकमध्ये लिक्विड डिटंर्जंट मिसळून एक सोल्यूशन तयार करा. या सोल्यबशनच्या मदतीने कारचे टायर आणि रिमवरील कठिण डाग आणि घाण स्वच्छ होण्यास मदत होईल.

डॅशबर्डसाठी ऑलिव्ह ऑइल

डॅशबोर्ड चमकवण्यासाठी तुम्हाला जर महागडं पॉलिश किंवा कंडिशनरवर पैसा खर्च करायचा नसेल तर तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एका स्वच्छ मायक्रो फायबरच्या कपड्यावर थोडं ऑलिव्ह ऑइल घेऊन त्याने डॅशबोर्ड स्वच्छ पुसायचं आहे. यामुळे डॅशबोर्ड चमकू लागेल.

त्याचप्रमाणे कार स्वच्छ धुण्यासाठी तुम्ही कोणत्याही सौम्य शॅम्पूचा वापर करू शकता. कारच्या एसीचे व्हेंट वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठी एखादा जुना मेकअप ब्रश किंवा पेंटिंग ब्रशचा तुम्ही वापर करू शकता. यामुळे व्हेंटमधील धूळ स्वच्छ करणं सोप होईल. अशा प्रकारे काही सोप्या ट्रिक वापरून तुम्ही कार स्वच्छ ठेवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com