Car Steering Care : तुमच्या कारचं स्टिअरींग सुरळीत काम करतंय का? कसं ओळखायचं, या टिप्स करतील मदत

अपघाताला आमंत्रण देऊ नका, वेळीच ओळखा स्टेअरिंगचे सिग्नल
Car Steering Care
Car Steering Care esakal

Car Steering Care : गाड्यांमध्ये अनेक व्हरायटी पहायला मिळत आहे. विविध प्रकारची टेक्नॉलॉजी आली असतानाही काहीवेळा गाडीचे पार्ट आपल्याला अचानक दगा देतात. त्यामुळे अपघाताला निमंत्रणच दिले जाते. कारच्या स्टिअरिंग व्हीलमधील नवनवीन सुधारणा झाल्या आहेत. तरीही काळीवेळा कारमध्ये बिघाड होतो.

गाडीचे स्टेअरिंगमध्ये काहीवेळा बिघाड होतो. त्यामुळे चालत्या गाडीला थांबवणे अवघड होऊन बसते. तुम्ही गाडी नियमित सर्व्हिसिंग करत असाल तरी देखील हा बिघाड होऊ शकतो. त्यामुळे गाडी हाताळताना काय काळजी घ्यायची. तसेच स्टिअरींगला प्रॉब्लेम आहे हे कसे ओळखायचे याबद्दल जाणून घेऊयात.

Car Steering Care
Car Care Tips : कार वायपर वापरण्याची योग्य पद्धत बऱ्याच जणांना माहिती नाही, जाणून घ्या योग्य पद्धत

कार वळवणे

जर तुमची गाडी वळण्यास त्रास होत असेल. त्यामुळे स्टीयरिंगमध्ये मोठा बिघाड होण्याची दाट शक्यता असते. स्टेअरिंग जाम झाल्यानेही असे होऊ शकते. त्यामुळे  सर्वप्रथम गाडीच्या टायर्समधील हवा आणि स्टेअरिंग फ्लुइड तपासले पाहिजे.

ऑईल चेक करणं

गाडी नीट चालवण्याकरिता योग्य प्रमाणात द्रव असणे आवश्यक आहे. कधीकधी हे द्रव कमी होते किंवा गळती होते. नंतर स्टीयरिंग जाम देखील होऊ शकते. म्हणूनच वेळच्या वेळी कारचे स्टीयरिंग फ्लुइड देखील तपासले पाहिजे. जर ते कमी असेल, तर ते टॉप अप केले पाहिजे.

गाडीचा मोठा अपघात होण्यापासून वाचवू शकतं तुमचं स्टेअरिंग
गाडीचा मोठा अपघात होण्यापासून वाचवू शकतं तुमचं स्टेअरिंगesakal
Car Steering Care
Car Care Tips: बोंबला! कारमध्ये पेट्रोलच्या जागी चुकून भरलंय डिजेल? आता काय करायचं!

स्टेअरिंग व्हायब्रेट होणं

तुमच्या कारच्या स्टिअरिंगमध्ये व्हायब्रेशन होत असल्यास त्यात बिघाड होतो. त्यामुळे गाडी व्यवस्थित ठेवायची असेल तर स्टेअरिंगच्या आवाजाकडे लक्ष द्या. जेव्हा कारचे स्टेअरिंग खराब होऊ लागते तेव्हा असे घडते. अशा स्थितीत गाडी चालवणेही टाळावे, कारण अशा परिस्थितीत स्टेअरिंग जाम देखील होऊ शकते.

 आवाज येणं

गाडी वळवताना स्टेअरिंग जाम झालं असेल. त्यातून आवाज येत असेल तर गाडी चांगल्या मेकॅनिकला दाखवावी. ब्रेक लावतानाही गाडीतून आवाज यायला लागला तर गाडी मेकॅनिककडे न्यावी.

Car Steering Care
Electric Cars : इलेक्ट्रिक वाहने खरेदीच्या यादीत या देशांचा पहिला नंबर; टॉप १० मध्ये भारत आहे का?

हुडमधून आवाज

स्टीयरिंग कनेक्टिंग रॉडद्वारे पुढील चाकांशी जोडलेले आहे. गाडी चालवताना हुडमधून आवाज येऊ लागल्यास, गाडी लवकरात लवकर चांगल्या मेकॅनिककडे नेली पाहिजे. तसे न केल्यास वाहन चालवताना अपघात होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com