तुमच्या कारमध्ये हे फिचर नसेल तर होवू शकतो गंभीर आजार

कारमधील अल्ट्राव्हायोलेट कट ग्लासमुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचं त्वचेसाठी हानिकारक असलेल्या UV किरणांपासून रक्षण होत असतं. यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद लुटता येतो
How to protect from UV rays in cars
How to protect from UV rays in carsEsakal

कार खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. कार खरेदी करत असताना आपण एक मोठी रक्कम खर्च करत असतो. यासाठीच कार खरेदी करत असताना प्रत्येकजणच सेफ्टीचा Safety विचार करून कारमध्ये Car सर्व सेफ्टी फिचर योग्य आहे का हे तपासत असतात. Car Purchase Tips Why UV Glass necessary for Car Windows

कारच्या बिल्डअप क्वालिटीसोबतच सीट बेल्ट आणि एअरबॅग Airbag हे सेफ्टी फिचर्स साधारणपणे तपासले जातात. मात्र कारमधील आणखी एक फिचरकडे Safety Features अनेकांकडून दुर्लक्ष केलं जातं आणि ते म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट कट ग्लास (UV Cut Glass).

कारमधील अल्ट्राव्हायोलेट कट ग्लासमुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांचं त्वचेसाठी हानिकारक असलेल्या UV किरणांपासून रक्षण होत असतं. यामुळे ड्रायव्हिंगचा आनंद लुटता येतो. 

उन्हामध्ये लपलेली अल्ट्राव्हायोलेट किरणं डोळ्यांना दिसणं शक्य नसलं तरी या किरणांमुळे त्वचा आणि डोळ्यांचं मोठं नुकसान होवू शकतं. तसंच जास्त वेळ अल्ट्राव्हायोलेट किरणांशी संपर्कात आल्यास आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होवू शकतात. यामध्ये अर्ली एजिंग , सनबर्नसह अनेक गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. शिवाय यामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढू शकतो. 

कारसाठी UV Cut Glass गरजेच्या 

त्वचेच्या या गंभीर समस्यांपासून बचाव करायचा असेल तर कारला UV Cut Glass असणं गरजेचं आहे. या ग्लास म्हणजेच काचा या खास करून अतिनील किरणांना ब्लॉक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या असतात. यासाठी या काचांवर खास कोटिंग लावण्यात येतं. त्यामुळे अतिनिल किरण कारच्या केबिनमध्ये प्रवेश करत नाहीत. 

हे देखिल वाचा-

How to protect from UV rays in cars
Best Sunroof Cars in India : इंडियामधल्या बेस्ट कार्स आणि त्यांचे अमेझिंग पॅनोरामिक सनरूफ...

अल्ट्रावायलेट किरणांमुळे होणारं नुकसान

  • अल्ट्राव्हायोलेटट किरणांमुळे शरीरातील मेलानिनचं प्रमाण कमी होऊ लागतं. यामुळे केसांची चमक कमी होवून केस निस्तेज दिसू लागतात. 

  • अतिनिल किरणांचा डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे मोतीबिंदू तसंच डोळ्यांचे इतर आजार होण्याची शक्यता वाढते. 

  • यूवी किरणांचा त्वचेच्या आतील सेल्सवर थेट परिणाम होत असल्याने त्वचेच्या कॅन्सरचा धोका वाढू लागतो. 

यासाठीच कार खरेदी करत असताना कारमध्ये UV Cut Glass असणं अत्यंत गरजेचं आहे. UV Cut Glassमुळे तुमचं अतिनिल किरणांपासून संरक्षण तर होईलच शिवाय यामुळे केबिनचं तापमान जवळपास २ डिग्रीने कमी राहण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

How to protect from UV rays in cars
Monsoon Car Tips : पावसाळ्यात गाडी चालवताना येऊ शकतात कित्येक अडचणी; गाडीत बसण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com