नखं सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी सोप्या टीप्स; वाचा घरगुती उपाय

care of nails for easy tips use for you in kolhapur
care of nails for easy tips use for you in kolhapur

कोल्हापूर : सुंदर दिसण्यासाठी बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत अनेक गोष्टी असतात. नखांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी नेलपेंट, नेल आर्ट यांचा वापर केला जातो. मात्र अनेकदा नेलपेंटमुळे किंवा नखांवर फंगलमुळे पिवळेपणा येतो. अशावेळी पिवळी आणि खराब नखं तुमच्या हाताचं सौंदर्य तर कमी करतातच पण तब्येतीसाठीही धोकादायक असतात. त्यामुळे नखांची योग्य निगा राखणंही महत्त्वाचं आहे. तुमची नखं जर पांढरी आणि चमकदार करायची असतील तर काही घरगुती उपाय नक्की वापरा. 

बेकिंग सोडा

फक्त अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरून नखं स्वच्छ करू शकता. बेकिंग सोड्यात अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळा. याचं मिश्रण पाच मिनिटं हलक्या हाताने नखांना चोळा आणि दहा मिनिटे तसंच ठेवा. दहा मिनिटानंतर कोमट पाण्याने हात स्वच्छ धुवा. 

विनेगार

विनेगारमुळेही तुमच्या नखांचा पिवळसरपणा कमी होण्यास मदत होते. एक कप कोमट पाण्यात एक चमचा व्हाइट विनेगार घाला. दहा मिनिटे तुमची बोटं या पाण्यात बुडवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवून पुसून घ्या. हात पुसल्यानंतर तुम्ही एखादा मॉइश्चरायजरसुद्धा लावू शकता. 

लिंबू

लिंबू हे एक नैसर्गिक ब्लिचिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. यामुळे नखं चमकदार होतात. यासाठी लिंबू घेऊन तो नखांवर घासावा किंवा एक कप पाण्यात लिंबाचा रस घालावा. या पाण्यात बोटं दहा ते 15 मिनिटं बुडवून ठेवायची. पुन्हा हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मॉइश्चरायजर लावायचा. 

लसूण

पिवळ्या नखांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर एक चांगला पर्याय आहे. लसूण वापरल्यास तुमची पिवळ्या नखांपासून सुटका होईल. लसून ठेचायचा आणि नखांवर चोळायचा. दोन मिनिटांनंतर हात स्वच्छ पुसून घ्या. आठवड्यातून दोन वेळा याचा वापर केलात तर नखांचा पिवळसरपणा जाईल.

(टीप - वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारवर आहे. याबाबत तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्यावा. सकाळ माध्यम समुह याच्याशी सहमत असेलच असं नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com