esakal | प्रेझेंटेशन देताना चुका होण्याची भीती वाटते?; असा वाढवा आत्मविश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

presentation

प्रेझेंटेशन देताना चुका होण्याची भीती वाटते?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोणतंही काम यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी मेहनत ही करावीच लागते. त्यामुळे ऑफिसमध्येदेखील सुद्धा आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण जीव तोडून मेहनत करत असतो. परंतु, अनेकदा संपूर्ण कामाचा आराखडा व्यवस्थित असतानादेखील आपण प्रेझेंटेशनमध्ये मार खातो. थोडक्यात सांगायचं झालं तर, अनेकदा आपण प्रेझेंटेशन देताना काही किरकोळ चुका करतो ज्यामुळे आपलं काम कितीही चांगलं असलं तरीदेखील आपल्याला रिजेक्ट केलं जातं. म्हणूनच, प्रेझेंटेशन करताना कोणत्या चुका टाळाव्यात ते आज जाणून घेऊयात. (career-and-money-are-you-scared-of-office-presentation)

१. घाबरु नका-

प्रेझेंटेशनमध्ये किंवा मिटींगमध्ये प्रत्येकाकडूनच काही ना काही चुका होत असतात. त्यामुळे दरवेळी माझीच चूक का होते? असा प्रश्न स्वत:ला विचारुन आत्मविश्वास कमी करु नका. स्वत:वर आणि स्वत:च्या कामावर विश्वास ठेवा. अनेकदा मिटींग रुममध्ये गेल्यावर नकळतपणे एक भीती मनात निर्माण होते. माझ्याकडून काही चूकणार तर नाही ना, मी मध्येच अडखळणार तर नाही ना असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. परंतु, या प्रश्नांना छेद द्या. आणि जे होईल ते पाहून घेऊ हा विश्वास मनात ठेवा व प्रेझेंटेशन द्या. प्रेझेंटेशन देताना आत्मविश्वास असणं अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे घाबरु नका. विशेष म्हणजे या भीतीचा किंवा दडपणाचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होऊ शकतो. अतिविचार किंवा अतिताण घेतल्यामुळे पॅनिक अॅटॅक येण्याचीही शक्यता असते.

हेही वाचा: ऑफिस मिटींगला जाण्यापूर्वी फॉलो करा 'या' महत्त्वपूर्ण गोष्टी

२. आत्मविश्वास महत्त्वाचा -

बऱ्याचदा आत्मविश्वास कमी असल्यामुळेदेखील प्रेझेंटेशन किंवा मिटींगमध्ये बोलताना तुमच्याकडून चुका होतात. त्यामुळे कधीही एखाद्या विषयावर व्यक्त होण्यापूर्वी त्याचा नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. जर तुमचा अभ्यास नीट असेल तर आपोआप तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल.

हेही वाचा: ऑफिस कलिगवर क्रश आहे?; तर 'ही' खबरदारी नक्की घ्या

३. बॉडी लँग्वेज -

प्रेझेंटेशन देताना बॉडी लँग्वेज म्हणजेच तुमची देहबोली नीट असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचा आत्मविश्वास दाखवण्यासाठी तुम्ही थेट समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बोला. जर तुम्ही सतत हातवारे करत असाल, फेऱ्या मारत असाल तर तुमचं प्रेझेंटेशनवर लक्ष नाही असं दिसून येईल. त्यामुळे एका जागी स्थिर राहून थेट संवाद साधा.

loading image